Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Ajit Pawar: मतदानाच्या वेळी बारामतीत राडा; कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर

Baramati assembly election 2024 Yugendra Pawar Vs Ajit Pawar : आम्ही निवडणूक लढताना सुसंस्कृतपणा दाखवतो फुले शाहू आंबेडकरांची आमची विचारधारा आहे. असं माझा कार्यकर्ता कधी करणार नाही. माझ्या कार्यकर्त्यांवर ठाम विश्वास असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

सरकारनामा ब्यूरो

शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटल्यानंतर प्रथमच विधानसभा निवडणूक होत आहे. बारामती मतदान केंद्रावर 'साहेब' अन् 'दादा' यांच्या समर्थकांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्याने राडा झाला. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेंकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. महात्मा गांधी बालक मंदीर या मतदान केंद्रावर दुपारी एकच्या सुमारास जोरदार बाचाबाची झाली.त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार असा सामना रंगत आहे. प्रचाराच्या सुरुवातीपासूनच दोन्ही गटांकडून मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोपांची राळ उठल्याचे पाहायला मिळाले. आता मतदान सुरू असताना अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून आमच्या कार्यकर्त्यांना धमकावले जात असल्याचं सांगत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे. याला अजित पवार यांनी देखील उत्तर दिलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाते उमदेवार युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर (अजित पवार गट) गंभीप आरोप केला आहे. अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून दमदाटी आणि ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप शर्मिला पवार यांनी केला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून हा आरोप फेटाळून लावण्यात आला आहे.

मतदान करण्यासाठी शर्मिला पवार आल्या होत्या, त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा मोठा आरोप केला आहे. शर्मिला पवार त्या ठिकाणी पोहोचल्या, त्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार हेही तेथे पोहोचले. शर्मिला पवार यांनी अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांवर केलेले आरोप अजित पवारांन खोडून काढले आहे. त्यामुळे या मतदानकेंद्रांबाहरे काही काळ तणावाचे वातावरण होते. आता परिस्थित सुरळीत असून मतदान शांततेत सुरु आहे.

शर्मिला पवार यांच्या मतदान केंद्रात जाण्यावरच अजित पवार यांचे निवडणूक प्रतिनिधी किरण गुजर यांनी आक्षेप घेतला आहे. त्या कोणत्या अधिकारात मतदान केंद्रात गेल्या असा सवाल करत शर्मिला पवार यांचे आरोप गुजर यांनी फेटाळले आहेत. अजित पवार म्हणाले, "शर्मिला पवार यांनी केलेले आरोप धादांत खोटे आहेत. या बाबत निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेईल. सीसीटीव्ही कॅमेरा फूटेज ते तपासून कारवाई करतील, असे अजित पवार यांनी सांगितले.

ते म्हणाले, स्लीपबाबत केलेले आरोपही बिनबुडाचे आहेत, अशा स्लीप वर्षानुवर्षे वाटप करण्याची प्रथा आहे. माझ्या कार्यकर्त्याला मतदान केंद्रातून बाहेर काढणे हेही चुकीचेच होते, हा अधिकार त्यांना नसताना असे कृत्य योग्य नाही," बारामतीत राडा झाला नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

आम्ही आतापर्यंत खूप निवडणुका पार पाडल्या आहेत. मात्र आमच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीची वक्तव्य कधीही केली नाहीत. आम्ही निवडणूक लढताना सुसंस्कृतपणा दाखवतो फुले शाहू आंबेडकरांची आमची विचारधारा आहे. असं माझा कार्यकर्ता कधी करणार नाही. माझ्या कार्यकर्त्यांवर ठाम विश्वास असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. उलट माझ्या पोलिंग एजंटला त्या ठिकाणावरून बाहेर काढण्यात आलं. निवडणूक अधिकाऱ्याच्या व्यतिरिक्त अशा प्रकारचा अधिकार कोणालाही नाही, असे अजित पवार म्हणाले.

मतदारांच्या स्लिप वाटण्यात आल्या त्याच्यावरच घड्याळाचं शिक्का असल्याचं आरोप करण्यात आला आहे. त्याला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, जेव्हा तुम्ही एखाद्या पक्षाचे उमेदवार अथवा कार्यकर्ते असतात तेव्हा ते एका पक्षाची स्लिप मतदारांना देतात. मतदानाला येताना त्या स्लीपवर असलेलं चिन्ह फाडून बाजूला काढायचा असतं ही पद्धत आत्ताच नाही तर फार पूर्वीपासून सुरू आहे. त्यामुळे या गोष्टीला फार महत्व देण्याची गरज नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT