Transport Setup for Voters: मतदारराजा अडकला वाहतूक कोंडीत ; सत्ताधाऱ्यांवर संतप्त

Candidates arrange transport from Pune to Kolhapur, Satara, Sangli : उमेदवारांकडून पुण्याहून कोल्हापूर,सातारा सांगली तसेच भोर ,राजगड आणि मुळशी परिसरामध्ये जाण्यासाठी व्यवस्था करून देण्यात आली आहे.
 Election 2024
Election 2024 sarkarnama
Published on
Updated on

Pune News: घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी आणि लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी मतदार राजा पश्चिम महाराष्ट्रात पोहचण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्यांना पुणे-बेंगलोर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. मतदानापूर्वी ही वेळ आल्यानं मतदार चांगलाच संतापलाय. काही तास हे मतदार वाहतूक कोंडीत अडकून पडले आहेत.

खेड शिवापूर टोल नाक्यावरून पुण्याकडे जाण्यासाठी आणि पुण्यातून कोल्हापूर, भोर सातारा, सांगली या भागातील मतदारसंघांकडे पोहोचण्यासाठी नागरिक सकाळी घरातून बाहेर पडले आहेत. मात्र शिवापूर टोल नाका येथे तब्बल पाच ते सात किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहेत.

एरवी कात्रजच्या नवले पुलावरून खेड शिवापूर टोल नाक्यावर पोहचण्यासाठी अवघे 15 ते 20 मिनिटं लागतात. आज मात्र दोन तासाहून आधी काळ मतदार या वाहतूक कोंडीत अडकून पडले आहेत. मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी मतदारांना वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने, हा मतदारराजा सत्ताधाऱ्यांवर चांगलाच संतप्त झालाय.

 Election 2024
Yugendra Pawar : निवडणुका म्हटलं की आरोप प्रत्यारोप होत असतातच, बारामतीकर नक्कीच पवार साहेबांना साथ देतील!

पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात लोक हे व्यवसाय आणि नोकरी निमित्त पुण्यामध्ये स्थलांतरित झाले आहेत असं असलं तरी बहुतांशी जणांच्या मतदान अद्यापही आपल्या मूळ गावी असल्याचं पाहायला मिळतं. या पश्चिम महाराष्ट्रातील मतदारांसाठी उमेदवारांनी देखील गावी पोहोचण्यासाठी व्यवस्था केल्याचं पाहायला मिळाला आहे.

 Election 2024
Chhatrapati Sambhajinagar : निवडणूक अधिकाऱ्यांची धावाधाव; मतदानाच्या सुरुवातीलाच 28 ठिकाणी बॅलेट युनिट बदलले

उमेदवारांकडून पुण्याहून कोल्हापूर,सातारा सांगली तसेच भोर ,राजगड आणि मुळशी परिसरामध्ये जाण्यासाठी व्यवस्था करून देण्यात आली आहेत. तर काही नागरिक मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी आज सकाळी सकाळीच आपल्या वाहनाने घराच्या बाहेर पडले मात्र या सर्वांना वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com