Covid 19 latest news
Covid 19 latest news  Sarkarnama
पुणे

Covid-19 Update: आताच सावध व्हा, नाहीतर पुन्हा लॉकडाऊन लावण्याची वेळ येईल...

योगीराज प्रभुणे

H3N2 News: राज्यासह संपूर्ण देशभरात एच३ एन२ या संसर्गजन्य आजाराचे रुग्ण वाढत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. असे असतानाच संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे.राज्यात गेल्या ती दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याची माहिती नुकतीच राज्याच्या आरोग्य खात्याने दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्याची चिंता वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Be careful now, or it will be time for another lockdown)

आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार,गेल्या 12 दिवसांत राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आढळलेल्या 712 पैकी 308 रुग्णांचे (43 टक्के) निदान गेल्या तीन दिवसांत झाले आहे. राज्यात मार्च २०२३ पर्यंत बहुतांश दरदिवशी नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या शंभरपेक्षा कमी होती. शुक्रवारपर्यंत (ता. 10 मार्च) कोरोनाचे सर्वाधिक म्हणजे 93 रुग्णांची नोंद होती. पण मार्चच्या पहिल्या नऊ दिवसांतच अचानक ही नोंद 409 रुग्णांपर्यंत पोहचली आहे.

शनिवारी (ता. 11) म्हणजे चोवीस तासातच 114 नव्या रुग्णांची आणि रविवारी (ता. 12) 101 नव्या रुग्णांचा आकडा वाढला. या तीन दिवसांमध्ये 308 नव्या रुग्णांचे निदान झाले. ही आकडेवारी पाहता कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आकडा सातत्याने वाढत असल्याचे दिसत आहे. या बाबत राज्याच्या सार्जनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न केला.मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील वातावरणात वेगाने बदल होत आहेत.कमाल आणि किमान तापमानातील तफावत,अचानक झालेली अतिवृष्टी, ढगाळ हवामान असे वातावरण विषाणूंच्या वाढीसाठी पोषक ठरते. त्यातून कोरोनासह इन्फ्लूएंझा विषाणूंच्या संसर्गामुळे आजारी पडणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. दीपक कांबळे यांनी म्हटलं आहे. दरम्यान राज्यात आजपर्यंत 551 कोरोनाचे सक्रिय रुग्ण असून त्यापैकी सर्वाधिक म्हणजे 185 रुग्ण एकट्या पुणे जिल्ह्यात आहेत. त्यानंतर मुंबईमध्ये 111 रुग्ण असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली.

तीन वर्षांपूर्वी 9 मार्च २०१९ रोजी राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला.त्यानंतर सलग दोन वर्ष देशात कोरोना महामारीने थैमान घातले. पण गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत या वर्षभरात कोरोना रुग्णांची संख्येत बरीच घट झाली. कोरोनामुळे उपचारांसाठी दाखल झालेल्या रुग्णांचे प्रमाणही अत्यंत कमी होते.

त्यामुळे आता आपण कोरोनामुक्त झालो, असा समज करून आपले दैनंदिन व्यवहार सुरू झाले. कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतरही खबरदारी घेण्याऐवजी आपण कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांकडे पाठ फिरविली. मास्क, सोशल डिस्टसिंग आणि वारंवार पाण्याने हात स्वच्छ धुणे ही त्रिसूत्रीचे विस्मरण झाले. पण याकडेच दुर्लक्ष केल्याने राज्यात पुन्हा कोरोनाच्या रुग्णांची संख्येत वाढ होऊ लागल्याचे निरीक्षण आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीतून पुढे येते.

एका दिवसात झालेल्या रुग्णांची नोंद

ठाणे ....... 40

पुणे .......... 25

नाशिक ..... 16

कोल्हापूर ..... 7

औरंगाबाद .... 0

लातूर, अकोला ...... 6

नागपूर .......... 1

त्रिसुत्रीचे पालन करा आणि काळजी घ्या

- मास्क घालूनच घराबाहेर पडा

- गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा

- हस्तांदोलन करू नका

- शिंकताना, खोकताना तोंडावर रुमाल ठेवा

कोरोनावर एक नजर

- राज्यातील बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण : 98.17 टक्के

- मृत्यू दर : 1.82 टक्के

- प्रयोगशाळा नमुन्यांच्या तुलनेत कोरोनाचे निदानाचे रुग्ण : 9.41 टक्के

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT