Hasan Mushrif News: ED समोर हजर राहणार की नाही..; हसन मुश्रीफांकडून..

Sugar Mill Corruption Case News: बँकेतील खोली ईडीने सील केली आहे.
Hasan Mushrif
Hasan Mushrif sarkarnama
Published on
Updated on

Hasan Mushrif ED News: सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या सभासदांवरून झालेल्या तक्रारीनंतर राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांना ईडीने समन्स बजावले आहे. त्यांना आज (सोमवारी) ईडी कार्यालयात हजर राहण्याचा आदेश बजावला आहे.

हसन मुश्रीफ आमदार आहेत. सध्या विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर मुश्रीफ ईडीसमोर हजर राहणार की, हजर राहण्यासाठी मुदत घेणार याकडे लक्ष लागले आहे. मुश्रीफ ईडी कार्यालयात चौकशीसाठी जाण्याची शक्यता कमी असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

हसन मुश्रीफ यांचे वकील ईडी कार्यालयात त्यांची बाजू मांडणार आहे. 11 जानेवारीच्या छाप्यानंतर हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयासह घोरपडे कारखान्याशी संबंधित दोन शाखांवर ईडीने छापे टाकले होते.

Hasan Mushrif
Money Laundering : मोठी बातमी : आमदार राहुल कुल यांच्यावर मनी लाँड्रींगचा आरोप ; राऊतांचे फडणवीसांना पत्र

बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसह अन्य अधिकार्‍यांना चौकशीसाठी मुंबईला नेले होते. बँकेतून घोरपडे कारखान्याशी संबंधित काही कागदपत्रे ताब्यात घेतली होतीत. त्याचप्रमाणे साखर कारखान्यांना दिल्या जाणार्‍या कर्जाची कागदपत्रे असलेली बँकेतील खोली ईडीने सील केली आहे.

8 मार्च रोजी राज्याच्या सहकार विभागाने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चाचणी लेखा परीक्षणाचे आदेश दिले. यामध्ये संताजी घोरपडे साखर कारखाना तसेच ब्रिस्क फॅसिलिटीज (शुगर डिव्हिजन) कंपनीला जिल्हा बँकेने दिलेले कर्ज तसेच शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या रकमांचा व बँकेचा सहसंबंध याचे विशेष लेखापरीक्षण होणार आहे.

Hasan Mushrif
Congress News: काँग्रेसला मोठा धक्का ; माजी मुख्यमंत्र्याचा राजीनामा; भाजपच्या वाटेवर..

मुश्रीफ नॉट रिचेबल

हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी ईडीने शनिवारी छापेमारी केली आहे. कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मुश्रीफ यांची सध्या चौकशी सुरु आहे. नऊ तासांच्या चौकशीनंतर ईडीने मुश्रीफ यांना समन्स बजावलं आहे. मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने दुसर्‍यांदा छापा टाकल्यापासून गेले तीस तास हसन मुश्रीफ हे नॉट रिचेबल आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com