Bhaiyya Mane News : पदवीधर मतदारसंघातून महायुतीत बंडखोरी करणाऱ्या भैय्या माने यांनी अखेर माघार घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत. उमेदवारी मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे.
भाजपकडून स्मिता पाटील-जाधव यांना पदवीधरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत. तर, राष्ट्रवादीकडून भैया माने इच्छुक होते. मात्र, महायुतीत ही जागा भाजपकडे गेल्याने त्यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार,भाजपकडून भैय्या माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी संवाद साधला जात होता. मात्र, ते निवडणूक लढण्यावर ठाम होते. मध्यरात्रींपासून स्थानिक पातळीवर भैया माने यांच्यावर दबाव वाढल्याची चर्चा होती. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर भैया माने यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
महायुतीमध्ये शिवसेनेतकडून मंगेश चिवटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ते माघार घेणार की नाही हे अजून स्पष्ट झाले नाही. त्यामुळे चिवटेंची उमेदवारी कायम राहिली तर ही लढत तिरंगी होण्याची शक्यता आहे. तसेच अपक्ष देखील मैदानात असल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे टेन्शन वाढणार आहे.
भाजपकडून शरद लाड यांनी देखील डमी अर्ज भरला होता. मात्र स्मिता जाधव यांचा अर्ज वैध ठरल्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.