Jalgaon News, 09 Oct : भाजप नेते किरीट सोमय्या सातत्याने मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगर शहरांचे दौरे करतात. बांगलादेशी नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून ते जोरदार आरोप करतात. त्यामुळे राजकीय वातावरण तापते, असा अनुभव आहे.
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बांगलादेशी नागरिकांच्या मुद्द्यावरून सातत्याने आरोपांच्या फैरी झाडल्या. विशेषतः मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय वातावरण तापविण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. यातून विरोधकांची कोंडी करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
एकीकडे या शहरांचे दौरे करून अल्पसंख्याक नागरिकांवर बांगलादेशी असल्याचा ठपका ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होता. प्रत्यक्षात मात्र शेजारील जळगाव जिल्ह्यात ३७२ पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिक राहत असल्याची अधिकृत माहिती पोलिसांनी दिली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी नियमानुसार कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हे नागरिक वास्तव्यास असल्याचे स्पष्ट केले आहे.
गेल्या काही वर्षांत यापैकी १०० पाकिस्तानी नागरिकांना नियमानुसार भारतीय नागरिकत्वही बहाल करण्यात आले आहे. भारत सरकारकडून पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील अल्पसंख्याक नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याची कायदेशीर प्रक्रिया आहे. त्याअंतर्गत पोलीस प्रशासनाने दीर्घकाळापासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांचे प्रस्ताव राज्याच्या गृह विभागाकडे पाठविले आहेत.
जळगाव शहरात फर्जना अली महंमद ही महिला २२ मार्च १९८५ पासून, तर फरीदा मुहूर्तजा ही महिला २८ जुलै २०१२ पासून वास्तव्यास आहे. या दोघींनी जळगावमधील स्थानिक नागरिकांशी विवाह केला आहे. त्यांच्या व्हिसाची मुदत २३ जुलै २०२७ पर्यंत आहे.
याव्यतिरिक्त, जळगाव शहरात ३७२ पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिक अधिकृतपणे वास्तव्यास आहेत. त्यापैकी १०० जणांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे. प्रशासनाने संमत केलेल्या सीएए कायद्याची अंमलबजावणी करून ही प्रक्रिया करण्यात येते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.