Bhidewada, Eknath shinde
Bhidewada, Eknath shinde Sarkarnama
पुणे

Bhidewada News : पुण्यातील भिडेवाड्याविषयी मोठी अपडेट; मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक

सरकारनामा ब्यूरो

Bhidewada News : पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली सावित्रीच्या लेकी यांनी हे आंदोलन पुकारले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी देखील भिडेवाड्याचा मुद्दा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मांडला होता. त्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भिडे वाड्याविषयी आॅनलाईन बैठक बोलावली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भिडे वाड्यासंदर्भात ऑनलाईन बैठक बोलावली आहे. या बैठकीत भिडे वाड्याबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीला पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार उपस्थित राहणार आहे. भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक बनवण्यासाठी आणि तिथे तिथे पुन्हा मुलींची शाळा सुरू करण्याबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

पुण्यातील भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली सावित्रीच्या लेकी यांनी हे आंदोलन केले आहे. भिडे वाड्यासमोर या आंदोलनाला आज सकाळी ८. ३० पासून सुरुवात झाली आहे.या आंदोलनाला फुले-शाहू-आंबेडकर प्रेमींनी पाठिंबा देत त्यात सहभागी झाले होते.

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर असलेल्या भिडे वाड्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरु केली होती. सध्या या भिडे वाड्याची दुरवस्था झाली आहे. या वास्तूचं जतन करून राष्ट्रीय स्मारक व्हावे अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी केली आहे. ही मागणी पूर्ण व्हावी यासाठी भिडे वाडयाबाहेर आढाव यांच्यासह सावित्रीच्या लेकी देखील या उपोषणात सहभागी झाल्या होत्या.

बाबा आढाव यांची मागणी काय?

फुले दाम्पत्यांनी ज्या ठिकाणाहून देशात क्रांती घडविण्याचं काम झाले. आज त्याच जागेची दुरवस्था झाली आहे. या ऐतिहासिक भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक झाले पाहिजे अशी मागणी आम्ही आजवर अनेक वेळा केली. यावर प्रक्रिया सुरू असल्याचे उत्तर दिले जात आहे. मात्र, शासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे यावर ठोस भूमिका मांडावी अशी मागणी आढाव यांनी यावेळी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT