Ajit Pawar on border dispute: '' कर्नाटकला जशास तसं उत्तर द्या; इंच इंच जमीन महाराष्ट्रात आली पाहिजे!''

Ajit Pawar : आजही माझी भूमिका तीच आहे....
Aiit Pawar
Aiit PawarSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar On Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद पेटला असतानाच त्यात पुन्हा एकदा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ठिणगी टाकली आहे. त्यांनी सीमाप्रश्न निकाली लागला असून महाराष्ट्राला इंचभरही जमीन दिली जाणार नाही असं विधान केलं आहे.बसवराज बोम्मई यांच्या विधानानंतर राजकारण पेटलं असून विरोधक चांगलेच संतापले आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)यांनी कर्नाटकला जशास तसं उत्तर देत इंच इंच जमीन महाराष्ट्रात आली पाहिजे असा गर्भित इशारा दिला आहे. (Ajit Pawar On Maharashtra Karnataka Border Dispute)

महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद एेरणीवर आला आहे. याचे तीव्र पडसाद विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात देखील उमटले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार हिवाळी अधिवेशनात यांनी सीमावादावर भाष्य केलं. पवार म्हणाले, मी सातत्याने बोलत आहे. आजही माझी भूमिका तीच आहे. जशास तसे उत्तर दिले पाहिजे.

Aiit Pawar
Yavatmal : सरपंचांच्या पळवापळवीत आपणच नंबर वन असल्याचा दावा किती करा किती खोटा?

सीमाभागातल्या मराठी भाषिकांच्या पाठीशी महाराष्ट्राचं विधिमंडळ उभे आहे. एक अन् एक इंच भाग महाराष्ट्रात आला पाहिजे असा ठराव दोन्ही सभागृहात मंजूर केला जाईल. त्याबद्दल मी पुन्हा सभागृहात विधानसभा अध्यक्षांना विचारुन तो ठराव कोणत्या तारखेला घ्यायचा याबाबत विनंती करणार आहे असंही विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले आहेत.

कर्नाटक सरकार जर त्यांच्या भूमिकेवर अडून राहिले आहेत. तर आपल्या सरकारने देखील मात्र, सीमाभाग महाराष्ट्रात आलाच पाहिजे. एक अन् एक इंच भाग महाराष्ट्रात आला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयातही राज्याच्यावतीने हीच भूमिका मांडण्याचं काम राज्य सरकारनं करावं अशी आमची त्यांच्याकडे आग्रही मागणी आहे असे पवार म्हणाले.

Aiit Pawar
Grampanchayat Election : राणापाटलांमुळे भाजपची ताकद वाढली, शिवसेनेत वाटेकरी वाढल्याने नुकसान..

सीमावादात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची ठिणगी...

सीमावादाचा प्रश्न न्यायप्रविष्ट असल्याने सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत दोन्ही राज्य त्यावर दावा करणार नाहीत असं विधान केलं होतं. मात्र, यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सीमावादाचा प्रश्न निकाली निघाली असून एक इंचही जमीन महाराष्ट्राला दिली जाणार नाही असं विधान कर्नाटक विधानसभेत केले आहे. तसेच सीमाप्रश्नी महाजन अहवाल अंतिम असल्याच्या कर्नाटकाच्या भूमिकेबाबत उद्या दोन्ही सभागृहात ठराव करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे सीमावर्ती भागात संतापाची लाट उसळली आहे.

''...आणि आपले मुख्यमंत्री गाळ चोळत विधानसभेत जातात!''

'कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला एक इंच जमीन देणार नाही, महाराष्ट्राच्या जागांवर हक्क सोडणार नाही असा ठराव मांडला आहे. इतकी बेअब्रू महाराष्ट्राची कधी झाली. तुमच्या तोंडात काय बोळा कोंबला आहे का? तुम्ही बोलत का नाही, कुणाला घाबरतात? असा कडक सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारला आहे. इतकी बेअब्रू महाराष्ट्राची कधी झाली. सीमाप्रश्न जुना असला तरी ही भाषा योग्य नाही. अमित शहांसोबत बैठक झाली तरी हे बोम्मई उठतात आणि महाराष्ट्राच्या कानफडात मारतात आणि आपले मुख्यमंत्री गाळ चोळत विधानसभेत जातात अशी घणाघाती टीका राऊत यांनी शिंदेंवर केली .

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com