Bhigwan girl abduction truth revealed sarkarnama
पुणे

Bhigwan Kidnapping Case : भिगवण प्रकरणात 'सकल हिंदू समाज' आक्रमक, आज बारामती, दौंड बंदची हाक

Bhigwan Baramati Daund Bandh : भिगवण अपहरण प्रकरणात मुलीकडून प्रतिज्ञापत्र दाखल करत तिचे अपहर झाले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, हिंदू संघटनांकडून लव्ह जिहादचे हे प्रकरण असल्याचे सांगत बंदची हाक दिली आहे.

Roshan More

Bhigwan Case : आपल्या 21 वर्षीय मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा भिगवण पोलिस ठाण्यात आई आणि भावाने नोंदवला होता. मात्र, या प्रकरणात मुलीने बारामती पोलिसांच्या समोर हजर राहत प्रतिज्ञापत्र दिले. तिने सांगतिले की, ती स्वमर्जीने मुलासोबत गेली. आणि त्याच्यासोबत राहू इच्छिते. आई-भावाने चुकीचा गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणात हिंदू संघटनांकडून लव्ह जिहादचा आरोप करण्यात येत आहे.

मुलीच्या प्रतिज्ञापत्रानंतर देखील हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. 'सकल हिंदू समाज'च्या वतीने आज भिगवण, बारामती आणि दौंडमध्ये बंदची हाक दिली आहे. या बंद दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिस देखील सज्ज झाले असून कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मुलीच्या आईकडून आरोप करण्यात येत आहे की, आपल्या मुलीवर दबाव आहे. ती 12 वर्षांची असल्यापासून आरोपींनी तिच्यावर लक्ष ठेवत होते. माझ्या पतीनेच कोरोनामध्ये निधन झाले. घरात कर्ता पुरुष नसल्याचा फायदा त्यांनी घेतला. आमची मागणी आहे मुलीला आमच्या स्वाधीन करावे.

आरोपींना राजकीय पाठींबा

मुलीच्या आईने आरोप केला की, आपल्या मुलीचे अपहरण करणाऱ्यांना आमदार राहुल कुल यांचा पाठींबा आहे. आरोपींनी त्यांचे स्टेटस लावले होते. तर, राहुल कुल यांनी देखील पुढे येत आपल्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे असून पोलिस प्रशासनाला कारवाई करण्याच आपण निर्देश दिल्याचे सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT