Rajya Sabha Election : ठाकरेंकडून राज्यसभेसाठी महिला नेत्याचे नाव फिक्स! ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजी?

Uddhav Thackeray Priyanka Chaturvedi : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यसभेच्या एका जागेवर दावा सांगितला जातोय. या जागेसाठी आदित्य ठाकरेंनी महिला नेत्याला संधी देण्याचे संकेत दिले आहेत.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Shiv Sena UBT : मार्च महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या वाट्याला एक जागा येणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत या जागेवर आपल्याकडे सर्वाधिक 20 आमदार असल्याचे सांगत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या जागेवर दावा सांगितला आहे. काँग्रेस देखील या जागेसाठी आग्रही आहे.

ही जागा कोणाला सुटणार याबाबत निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला बाजुला ठेवत या जागेसाठी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. ही जागा आपल्याकडे आली तर त्यासाठी ठाकरेंकडून एक महिला नेत्याचे नाव देखील निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. त्याबाबत आदित्य ठाकरेंनी संकेत देखील दिले आहे.

ठाकरेंच्या पक्षाकडून या जागेसाठी ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे, विनायक राऊत, राजन विचारे, सुभाष देसाई संधी मिळेल अशी देखील चर्चा होती. मात्र, आदित्य ठाकरेंच्या संकेतानंतर ही नेत्यांची जुनी फळी नाराज होण्याची शक्यता आहे.

राज्यसभेतील ठाकरेंच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांचा कार्यकाळ संपला आहे. मात्र, त्यांनाच पुन्हा संधी मिळण्याचे संकेत मिळत आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांनी संसदेत बजावलेली कामगिरी पाहता, या दोन्ही जागा पुन्हा शिवसेनेकडेच राहाव्यात, असे आमचे स्पष्ट मत आहे.

Uddhav Thackeray
Mukul Roy Passes Away : बंगालच्या राजकारणातील चाणक्य, माजी रेल्वेमंत्री मुकुल राॅय यांचे निधन

काँग्रेस राज्यसभेसाठी ठाम

उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेमधील कार्यकाळ संपत आहे.त्यामुळे विधान परिषदेची जागा त्यांना सोडत त्याबदल्यात राज्यसभेची जागा काँग्रेसला सोडण्यात यावी, असा प्रस्ताव काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे ठाकरेंना देणार आहेत. सपकाळ यांनी पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना

Uddhav Thackeray
Budget Session 2026 : AI समिटमध्ये आंदोलन, राजकारणाला पेटवणारी ठिणगी; ‘चड्डी-बनियन गँग’वर घणाघात, शिंदेंचा कडक इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com