Bhigwan girl abduction truth revealed sarkarnama
पुणे

Bhigwan Kidnapping Case : भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट, मुलगी पोलिस ठाण्यात हजर; अपहरण, भाऊ अन् महाबळेश्वरला फरार, सगळच सांगितलं!

Missing girl appears at police station: मुलीच्या अपहरणाची केस भिगवण पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. आता मुलगी स्वतः बारामीत पोलिस ठाण्यात हजर झाली असून तिने नोंदवलेल्या जबाबामुळे या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे.

Roshan More

Bhigwan Kidnapping Case Full Story: भिगवणमधील मुलीच्या आई आणि भावाच्या डोळ्यात मसाला टाकून मुलीचे अपहरण केल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. या अपहरणाला धार्मिक रंग दिल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते. भिगवणमध्ये बंद पाळत हिंदू आक्रोश मोर्चा देखील काढण्यात आला होता. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता.

दरम्यान, मुलीने व्हिडिओ करत आपले अपहरण झाले नसल्याचे सांगत आपण स्वतः मुलाबरोबर गेलो आहोत. आपले आणि त्याचे मागील दोन वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे सांगितले होते. त्यामुळे या प्रकरणाला वेगळेवळण लागले. दरम्यान, मुलीवर दबाव असून त्यातून तिने हा व्हिडिओ केल्याचा आरोप आमदार पडळकर आणि मुलीच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला होता.

अखरे मुलगी पोलिस ठाण्यात हजर झाली असून तिने आपला जबाब नोंदवला आहे.ती कुठे कुठे लपून बसली होती याची देखील माहिती तिने दिली आहे. तिने बारामती पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, तिचे अपहरण झाले नाही. ती तिच्या मर्जीने मुलासोबत गेली होती. श्रीगोंदा, अहिल्यानगर, शिक्रापूर, पुणे सासवड असा प्रवास करून ते महाबळेश्वरला येथे गेले होते.

चटणी टाकल्याचा बनाव...

मुलीच्या भावाने पोलिसांमध्ये तक्रार दिली होती की जहीर हरून शेख, आयान हरून शेख यांनी आपल्या डोळ्यात चटणी टाकून आपल्या बहिणीचे अपहरण केले. तिला जबरदस्तीने सोबत घेऊन गेले. दरम्यान, मेडिकल रिपोर्टमध्ये मुलीच्या भावाच्या डोळ्यात चटणी टाकली नसल्याचे स्पष्ट झाले.

मुलीने भावाच्या मोबाईलवरून प्रियकाराला बोलावून घेऊन ती त्याच्यासोबत निघून गेल्याची माहिती पुढे आली. दरम्यान, मुलगी पोलिस ठाण्यात हजर झाली असता पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांना पोलिस ठाण्यात बोलवले मात्र कुटुंबातील कोणतीही व्यक्त पोलिस ठाण्यात आली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT