MP Ricky Andrew J Syngkon: ज्येष्ठ खासदाराचा मृत्यू! फुटबॉल खेळताना मैदानावरच कोसळले

Meghalaya MP Ricky Andrew J Syngkon Passes Away: रिकी अँड्र्यू जे. सिंगकॉन हे आपल्या मित्रांसोबत फुटबॉल खेळत होते.फुटबॉल खेळताना ते अचानक कोसळले अन् त्यानंतर काही वेळातच त्यांचं निधन झाले अशी माहिती व्हॉइस ऑफ द पीपल पार्टीने (व्हीपीपी) दिली आहे.
Shillong MP Ricky Andrew J Syngkon dies at 54
Shillong MP Ricky Andrew J Syngkon dies at 54Sarkarnama
Published on
Updated on

Shillong MP Ricky Syngkon died after collapsing during football: मेघालयातील व्हीपीपी पक्षाचे ज्येष्ठ नेते, खासदार रिकी अँड्र्यू जे. सिंगकॉन यांचे फुटबॉल खेळताना निधन झाले असल्याची माहिती समोर येत आहे. ते ५४ वर्षांचे होते.

काल (गुरूवारी) सायंकाळी शिलाँगमधील मावलाई मविओंग भागात रिकी अँड्र्यू जे. सिंगकॉन हे आपल्या मित्रांसोबत फुटबॉल खेळत होते. फुटबॉल खेळताना ते अचानक कोसळले अन् त्यानंतर काही वेळातच त्यांचं निधन झाले अशी माहिती व्हॉइस ऑफ द पीपल पार्टीने (व्हीपीपी) दिली आहे.

सिंगकॉन हे शिलांगच्या जवळील मावियोंग परिसरात फुटबॉल खेळत असताना ही घटना घडली, त्यांना ह्दयविकाराचा झटका आला असावा, अशी प्राथमिक माहिती आहे. त्यांना तातडीने मविओंग कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना डॉ. एच. गॉर्डन रॉबर्ट्स हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.

उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. गुरूवारी रात्री ८:४५ वाजता हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झालेला असेल अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.रिकी अँड्र्यू यांच्या निधनानंतर मेघालयाच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दुःख

सिंगकॉन यांच्या निधनावर मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड के.संगमा यांनी दु:ख व्यक्त केले. ते म्हणाले, "खासदार रिकी सिंगकॉन यांच्या अकाली निधनाच्या बातमीने मला धक्का बसला आहे. ते जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करणारे समर्पित लोकप्रतिनिधी होते. त्यांचे जाणे राज्याचे मोठे नुकसान आहे."

मेघालयाच्या राजकारणा रिकी अँड्र्यू जे. सिंगकॉन यांचे मोठे वजन होते. शिलाँगमध्ये त्यांचा राजकीय दबदबा होता. रिकी अँड्र्यू जे. सिंगकॉन हे फक्त राजकारणीच नव्हते तर शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचं मोठं काम होते. त्यांनी अनेकवर्षे प्राध्यापक म्हणून मुलांना घडवले आहे. साधेपणा आणि जनतेमध्ये तळागाळातील कामासाठी रिकी अँड्र्यू जे. सिंगकॉन यांना शिलाँगमध्ये ओळखले जात होते. नॉर्थ-ईस्टर्न हिल यूनिवर्सिटी मध्ये ते अर्थशास्त्राचे सहायक प्राध्यापक होते.

Shillong MP Ricky Andrew J Syngkon dies at 54
Bala Bhegade: भेगडेंचा शेळकेंना इशारा! आरोप आठ दिवसांत सिद्ध करा, अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करू

रिकी सिंगकॉनने यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शिलाँगमधून ऐतिहासिक विजय मिळवला होता.त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते विन्सेंट पाला यांचा मोठ्या मतांनी पराभव करत पहिल्यांदाच संसदेत प्रवेश केला. विन्सेंट पाला यांचा त्यांना सलग चारवेळा पराभव केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com