Bhigwan Kidnapping Case Gopichand Padalkar sarkarnama
पुणे

Gopichand Padalkar : भिगवण अपहरण प्रकरणातील मुलगी पोलिस ठाण्यात येताच गोपीचंद पडळकरांचा धक्कादायक दावा, 'कुठल्याही परिस्थितीमध्ये... '

Bhigwan Kidnapping Case Gopichand Padalkar : अपहरण करण्यात आल्याची तक्रार करण्यात आलेली मुलगी बारामती पोलिस ठाण्यात हजर झाली. दरम्यान, आमदार गोपीचंद पडळकर यांनी या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Roshan More

Gopichand Padalkar News : भिगवणमधील मुलीचे अपहरण प्रकरणाला धक्कायदाक वळण लागले आहे. मुलीने व्हिडिओ करून आपले अपहरण झाले नसल्याचे सांगितले होते. आता ती थेट बारामती पोलिस ठाण्यात हजर झाली आणि जबाब नोंदवत तिने प्रतिज्ञापत्र सादर केले. आपले अपहरण झाले नव्हते प्रेमसंबंधातून आपण निघून गेलो होतो. आई-भावाने चुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आपण सज्ञान असून त्या मुलासोबतच राहणार आहे.

दरम्यान, 'मुलगी पोलिस ठाण्यात हजर झाल्यानंतर या प्रकरणात हिंदू आक्रोश मोर्चा काढणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, 'या प्रकरणाला वेगळं वळण दिलं जातंय. पोलिस प्रशासनाला आवाहन, विनंती आहे की या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन त्या मुलांना सपोर्ट कोण करत आहे. यामध्ये कोण सहभागी आहेत याचा तपास करून गुन्हे दाखल करावेत. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मुलीला तिच्या आईच्या आणि भावाच्या ताब्यात दिले पाहिजे.'

मुलीने चटणी टाकून आपले अपहरण केले गेले नसल्याचे जबाब दिला आहे. त्याबाबत बोलताना पडळकर म्हणाले, 'मुलीचे स्टेटमेंट हा बनाव आहे. त्या मुलीच्या भावाचे म्हणणं आहे की डोळ्यात चटणी टाकून मुलीला पळवलं आहे. जर यांचे प्रेमसंबंध होते यांच्या घराला लागून घर आहे मग बाजारातून पळवायची गरज काय होती?'

'मी परवा तेथे गेलो तेव्हा त्या मुलाच्या डोक्यात तशीच चटणी होती. पोलिसांनी पंचनामा केला तेव्हा तेथे चटणी दिसली आहे. ती काय घरातून घेऊन गेले होते का?', असा सवाल देखील पडळकर यांनी उपस्थित केला आहे.

वडील नाही त्या मुली टार्गेट

'या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा बनवा करू नये. मुलगी कुठल्याही परिस्थितीमध्ये आई आणि भावाच्या ताब्यात दिली पाहिजे. तिचं लग्न होतं 22 तारखेला होतं. ज्या मुलींना वडील नाही त्यांना टार्गेट केलं जात आहे. 25 मुलींची प्रकरणं इंदापूर तालुक्यात घडली आहेत. ही काही साधी बाब नाही.', असे देखील ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT