Amol Kolhe : पुण्यात अमोल कोल्हेंची तोफ धडाडण्यापूर्वीच 'ब्रेक'? शिवाजी महाराजांच्या व्याख्यानावरून 'हायव्होल्टेज ड्रामा'

Amol Kolhe speech stopped in Pune : पुण्यात अमोल कोल्हेंच्या नियोजित व्याख्यानाआधीच वाद निर्माण झाला. थेट कुलगुरूंकडे तक्रार दाखल करण्यात आली. नेमका वाद कशामुळे निर्माण झाला? वाचा सविस्तर बातमी.
SPPU Amol Kolhe speech controversy
SPPU Amol Kolhe speech controversySarkarnama
Published on
Updated on

Amol Kolhe Shivaji Maharaj lecture controversy: पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. अभिनेते खासदार अमोल कोल्हे यांच्या व्याख्यानाला विद्यार्थी संघनांनी तीव्र विरोध दर्शवला असून याप्रकरणी थेट विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन देण्यात आले आहे. त्यामुळे हा कार्यक्रम होणार का याबाबत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेले अमोल कोल्हे हे शिवचरित्राचा अभ्यास करणारे वक्ते म्हणून ओळखले जातात. 19 फेब्रुवारी 2025 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिवजयंतीच्या निमित्ताने इरावती कर्वे सभागृहात त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमाला राजकीय छटा मिळू शकते, असा आक्षेप घेत काही विद्यार्थ्यांनी विरोधाची भूमिका घेतली.

SPPU Amol Kolhe speech controversy
Chhagan Bhujbal : रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर छगन भुजबळांची फटकेबाजी; 'तिरकस' प्रश्नाने राष्ट्रवादीतील संघर्ष पेटणार?

सकल विद्यार्थी समूहाच्या वतीने कुलगुरूंना सादर करण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, शिवजयंती हा सर्व समाजाचा उत्सव आहे आणि तो कोणत्याही राजकीय चौकटीत अडकवला जाऊ नये. संबंधित कार्यक्रमाबाबत शिवजन्मोत्सव विद्यार्थी उत्सव समितीला पूर्वकल्पना देण्यात आली नाही, तसेच केवळ काही जणांच्या पुढाकारातून राजकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला आमंत्रित करण्यात आले. त्यामुळे विद्यापीठ परिसरात राजकीय वातावरण निर्माण होऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

विद्यार्थी समूहाने प्रशासनाला थेट प्रश्न विचारला आहे की, विद्यापीठ अशा स्वरूपाच्या कार्यक्रमांना मान्यता देते का? जर हा कार्यक्रम राजकीय हेतूने आयोजित केला असेल, तर तो तात्काळ रद्द करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. यासोबतच इशाराही देण्यात आला असून विद्यार्थ्यांच्या भावना दुर्लक्षित केल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल, असे संकेत दिले आहेत.

दुसरीकडे, काही विद्यार्थ्यांनी अमोल कोल्हे यांच्या समर्थनार्थही पत्र दिले आहे. त्यांच्या मते, विद्यापीठात दरवर्षी विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्त अभ्यासू वक्त्यांना निमंत्रित केले जाते. अशा कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांना इतिहास, विचार आणि प्रेरणा मिळते. अमोल कोल्हे यांनी शिवचरित्रावर सखोल अभ्यास केला असून त्यांच्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळेल, असा विश्वास समर्थक विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.

समर्थक विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, एखादी व्यक्ती राजकारणात सक्रिय असली तरी तिचे शैक्षणिक किंवा ऐतिहासिक विषयांवरील ज्ञान नाकारता येत नाही. विद्यापीठाने विचारांचे व्यासपीठ खुले ठेवावे आणि विविध मतप्रवाहांना संधी द्यावी, अशी त्यांची भूमिका आहे. भविष्यातही अशाच प्रकारे प्रेरणादायी आणि अभ्यासू व्यक्तींना आमंत्रित करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

SPPU Amol Kolhe speech controversy
भिवंडीतील सत्ता संघर्षाचा 'क्लायमॅक्स'! काँग्रेसला साथ दिल्यास भाजपचे 9 शिलेदार अपात्र ठरणार? स्नेहा पाटलांसाठी व्हीप

या सर्व घडामोडींवर अमोल कोल्हे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.'आपण कलाकार आणि अभ्यासक म्हणून व्याख्यान देण्यासाठी जात आहोत, त्यात कोणालाही आक्षेप असण्याचे कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या विचारांचा प्रसार करणे हा उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com