Political contest heats up in Bhor as Sangram Thopte and Shankar Mandekar face each other in the Panchayat Samiti election.  sarkarnama
पुणे

Bhor Politics : भोरच्या राजकारणात बाई अन् बादलीची चर्चा, विजयानंतर 'त्या' कृतीने खळबळ, संघर्ष तीव्र होणार...

Panchayat Samiti Election Sangram Thopte vs Shankar Mandekar : विधानसभेतील पराभवनानंतर संग्राम थोपटे अजुनही सावरलेले दिसत नाही. पंचायत समितीमध्ये झालेल्या पराभवानंतर राष्ट्रवादी कडून त्यांना डिवचण्याची एकही संधी सोडली जात नाही.

Sudesh Mitkar

Pune News : गेले अनेक दशकांपासून भोरमध्ये थोपटे घराण्याच वर्चस्व होतं. काँग्रेसनिष्ठ म्हणून ते ओळखले जात होते. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत फासे पलटले आणि संग्राम थोपटेंना पराभवाचा धक्का बसला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकर मांडेकर यांनी थोपटेंचा पराभव केला.

पराभवनानंतर थोपटेंनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून भोर-मुळशीच्या राजकारणात थोपटे आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील संघर्ष दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. या संघर्षात आता बाई आणि बादलीची जोरदार चर्चा आहे.

या चर्चांची सुरुवात भोर नगरपालिका निवडणुकी दरम्यान झाली. थोपटे यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या आवरे यांना राष्ट्रवादीने पक्षात घेऊन नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आवारे यांनी निवडून आल्यानंतर 24 तास पाणी देण्याचा आश्वासन दिलं होतं.

या आश्वासनानंतर माजी आमदार संग्राम थोपटे यांनी एका जाहीर सभेमध्ये तुमच्याकडे आधी देखील नगरपालिकेचं अध्यक्ष पद होतं तेव्हा तुम्ही काय बादलीने पाणी भरत होता का ? असाच सवाल केला होता. या वक्तव्यानंतर थोपटे समर्थकांनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बादलीचे मीम्स बनल्याचे पाहायला मिळालं.

त्यानंतर नगरपालिका निवडणुकीत आवारे विजयी झाले आणि या विजय निवडणुकीमध्ये आवारे यांच्या समर्थकांनी जल्लोषात बादल्या नाचवल्या आणि थोपटे यांच्या समर्थकांना डिवचले.

जिल्हा परिषदेत संघर्ष

जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये देखील भाजपा राष्ट्रवादीचा संघर्ष सुरूच राहिला आणि या निवडणुकीत संग्राम थोपटे यांनी आपल्या पत्नीला निवडणूक रिंगणात उतरवत जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या रेस मध्ये असणाऱ्या राष्ट्रवादीच्या रणजीत शिवतरे यांचा पराभव केला.

मागील वेळी नगरपालिका निवडणुकीच्या विजय रॅलीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बादल्या नाचवल्या होत्या तर या निवडणुकीच्या विजयानंतर थोपटे यांच्या समर्थकांनी बादल्या आपटल्या आणि फोडल्याच पहिला मिळाले. बादलीवाले दिसत नाही, असे पोस्टरही झळकवले. त्यासोबतच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बाईने पाडलं म्हणणार एक व्हिडिओ शेअर करत शिवतरे आणि त्यांच्या समर्थकांना डिवचण्याचा प्रयत्न थोपटे यांच्या समर्थकांकडून झाला.

पंचायत समितीमध्ये परतफेड

आता या वादाचा तिसरा अंक भोर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीवेळी पाहायला मिळाला. पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचे चार आणि भाजपचे चार सदस्य निवडून आल्याने चिठ्ठीद्वारे सभापती, उपसभापती निवडण्यात आली. यात राष्ट्रवादीची चिठ्ठी पडल्याने कार्यकर्त्यांकडून एकच जल्लोष करत हा विजय साजरा करण्यात आला.

या विजय जल्लोषादरम्यान देखील बाई आणि बादलीची चर्चा झाली. कारण विजय जल्लोषामध्ये 'बादलीवाला पुन्हा आलाय', अशा आशयाचे बॅनर झळकवण्यात आले . तसेच आसमान दाखवणाऱ्यांना आम्ही 2007 लाच आसमान दाखवले आहे. 'बाईचा विषयच राहत नाही', असे पोस्टर झळकवत थोपटे समर्थकांना डिवचण्यात आले.

संघर्ष आणखी तीव्र होणार

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून 'आमदारकी गेली, जिल्हा परिषद गेली नगरपालिका गेली आणि आता बाईच्या नादात पंचायत समिती गेली', असे पोस्टर झळकवण्यात आले. प्रत्येक निवडणुकीमध्ये सुरू असलेला हा संघर्ष आणखीनच तीव्र होताना दिसतो आहे. आमदार मांडेकर आणि संग्राम थोपटे यांचे समर्थक सोशल मीडियावर एकमकेंना डिवचण्याची एकही संधी सोडत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT