MLA Mahesh Landge Death threat case Filed Sarkarnama
पुणे

VIDEO: भाजप आमदाराला मारण्याची सुपारी? पोलीस कंट्रोल रुमला फोन

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी चिंचवड : भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. "मला महेश लांडगे यांना मारण्याची सुपारी मिळाली आहे,' असा फोन पोलीस कंट्रोल रुमला आला आहे. आमदार लांडगे यांना दिली जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली.

या प्रकरणी मोशी मधील एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. उदय कुमार राय असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या विरोधात भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल (शनिवारी) ही घटना घडली. उदयकुमार राय यांची पोलीस कसून चौकशी करीत आहे. मुळचा छत्तीसगडचा असलेला उदयकुमार राय हा पाच वर्षांपासून भोसरीमध्ये राहतो. त्याला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.धमकी देण्याचं कारण अद्याप समजू शकलं नाही.

आमदार महेश लांडगे यांना दुसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.यापूर्वीही लांडगे यांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. अज्ञात आरोपीने त्यांना मेसेज करून 30 लाखांची खंडणी मागत धमकी दिली होती.

भोसरी विधानसभा क्षेत्रातील नागरीकांच्या समस्या सोडवण्यासाठी महेश लांडगे यांनी हेल्पलाईन सुरु केलेली होती. याच हेल्पलाईनवरून महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणीही गुन्हा दाखल आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT