Chandrakant Patil: महापालिकेला जमलं नाही, एका आमदारानं करून दाखवलं!

Pune Ganeshotsav 2024 MLA Chandrakant Patil: पुणे शहरात सुरू जुलै आणि ऑगस्टमध्ये झालेल्या पावसामुळे शहर आणि उपनगरांमध्ये ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी खड्डे बुजविण्यात येतील, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली होती.
PMC News
PMC News Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे पुणेकर त्रस्त आहेत अशातच गणपती उत्सवामध्ये बाहेरून येणाऱ्या गणपती भक्तांना देखील या समस्यांना तोंड द्यावे लागणार असल्याचे चित्र सध्या शहरात पाहायला मिळत आहे.

कोथरूड परिसरात देखील पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. महापालिका प्रशासन हे खड्डे बुजवण्यात कुठेतरी कमी पडत आहेत, त्यामुळे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेऊन खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली आहे.

पुणे शहरात जुलै आणि ऑगस्टमध्ये झालेल्या पावसामुळे शहर आणि उपनगरांमध्ये ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी खड्डे बुजविण्यात येतील, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली होती. त्यानंतर महापालिका प्रशासनाकडून खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले; तरी अपुऱ्या मनुष्यबळामुळे या काम पूर्ण होऊ शकले नाही.

परिणामी वारंवार पडणाऱ्या पावसामुळे नव्याने खड्डे पडण्याने नागरिक देखील हैराण झाले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. लोकसहभागातून मतदारसंघातील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे.

PMC News
Jammu Kashmir Elections: जम्मू काश्मीरमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कुठल्या पक्षाचा? सरासरी संपत्ती तीन कोटी

या अंतर्गत आतापर्यंत कोथरुड मतदारसंघातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. बाणेर बालेवाडी पाषाण सुतारवाडीमधील मुख्य रस्त्यांवरील ४० खड्डे, कोथरूड मधील ३०० खड्डे बुजवले आहेत. उर्वरित खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोथरुडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पुणे शहरातील गणपती आणि देखावे पाहण्यासाठी सबंध महाराष्ट्र, सह देशातून आणि परदेशातून गणेश भक्त पुण्यात येतात. या गणेश भक्तांना सुविधा होऊ नये म्हणून महापालिकेने तातडीने रस्ते दुरुस्ती करण्याबरोबरच पार्किंगची सुविधा देखील अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

शहरातील अनेक भागात सध्या वाहतूक कोंडी होत आहे. आज (रविवारी) ऋषीपंचमीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून बाप्पाचे अथर्वशीर्ष पठण करण्यात येणार आहे. त्यामुळे मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com