Pune ACB Trap Sarkarnama
पुणे

Pune ACB Trap: 'एसीबी'चा जोरदार दणका; लोणावळा पोलिस ठाण्यातील 'एपीआय'च लाचखोरीत अडकला

Pimpri-Chinchwad : गेल्या २४ तासांत एसीबीचा दुसरा ट्रॅप, मावळचा विस्तार अधिकारी, तर आज तालुक्यातील एपीआय लाचखोरीत अडकला

उत्तम कुटे

Pimpri News: सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने सोन्याचे अंडे देणारी कोंबडी असलेल्या मावळातील लाचखोरी आता वाढतच चालली आहे. गेल्या २४ तासांत लाचखोरीचा दुसरा गुन्हा शुक्रवारी दाखल झाला.

गुन्ह्यातील दोन आरोपींच्या दोषमुक्तीचा अहवाल (ए फायनल) पाठविण्यासाठी त्यांच्याकडे एक लाख चाळीस हजार रुपयांची लाच मागणारा लोणावळा (ता. मावळ) ग्रामीण पोलिस ठाण्यातील एपीआय देविदास हिरामण करंडे याला एसीबीने आज जोरदार दणका दिला.

कालच मावळचा विस्तार अधिकारी अंकुश किसन खांडेकर (वय ५७) याला वडगाव मावळ येथील तालुका पंचायत समिती कार्यालयातच चाळीस हजारांची लाच घेताना पकडण्यात आले होते. त्याला २४ तास उलटायच्या आत तालुक्यात दुसऱ्या मोठ्या लाचखोरीवर आज शिक्कामोर्तब झाले.

तर दहा दिवसांपूर्वी कोरोना काळात पुरविलेले सॅनिटायझर व उभारलेल्या गॅस शवदाहिनीचे बिल मंजूर करण्यासाठी बिलाच्या एक टक्के लाच मागणाऱ्या मावळ तालुक्यातीलच (जि. पुणे) तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा (ता. मावळ) अकाउंटंट नरेंद्र अनंतराव कणसे (वय 55) याला एसीबीने दणका दिला होता. एकूणच दहा दिवसांत मावळातील खाबूगिरीची तीन प्रकरणे समोर आल्याने तेथील सरकारी कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.

आजच्या लाचखोरीच्या घटनेत एपीआय करंडेने त्याच्याकडे तपास असलेला गुन्हा अ फायनल करण्यासाठी (म्हणजे त्यातील आऱोपींच्या दोषमुक्तीचा अहवाल न्यायालयाला पाठविण्याकरिता) त्यातील आरोपी महिलेकडे पन्नास हजार लाच मागितली.

त्याबाबत तिने एसीबीत तक्रार केली. त्य़ाच्या पडताळणीत करंडेने त्याच गुन्ह्यातील दुसऱ्या आरोपीकडेही एक लाख रुपये लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याच्याविरुद्ध लोणावळा शहर पोलिस ठाण्यात लाच मागितल्याबद्दल एसीबीने गुन्हा नोंद केला.

Edited by Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT