NCP Hearing : शरद पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी; ‘राष्ट्रवादीचा निर्णय होईपर्यंत चिन्हे गोठवू नका’

Election Commission Hearing : राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्षचिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे.
Election Commission Hearing
Election Commission Hearing Sarkarnama
Published on
Updated on

New Delhi : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्णय होईपर्यंत चिन्ह गोठवू नये, अशी मोठी मागणी शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू संघवी यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. ('Don't freeze symbols till the decision of the ncp ': Sharad Pawar group's demand)

राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्षचिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. शरद पवार गटाकडून अभिषेक मनू संघवी हे युक्तिवाद करत आहेत. स्वतः पवार, आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार वंदना चव्हाण या वेळी उपस्थित होते. अजित पवार गटाकडून महेश जेठमलानी, नीरज किशन कौर, मनिंदरसिंग हे युक्तिवाद करत आहेत.

Election Commission Hearing
NCP Hearing : शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात, जयंत पाटलांची नियुक्ती बेकायदा; सुनावणीत अजितदादा गटाचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेस हा मूळ पक्ष आमच्याकडे आहे, पक्षातील केवळ एक गट बाहेर पडला आहे. आमदारांची संख्या जास्त आहे म्हणून फरक पडत नाही. त्यांचा पक्ष ठरू शकत नाही. काही लोक सोडून गेले असतील आणि ते आमदार असले तरीही मूळ पक्ष आमचा आहे. पक्षाच्या घटनेतील पदे पाहता आमचा दावा योग्य आहे, असा युक्तिवाद शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू संघवी यांनी केला आहे.

मुख्य प्रतोद अनिल पाटील यांची नियुक्तीही आमच्याकडून करण्यात आलेली आहे, असा दावाही संघवी यांनी केला आहे. दरम्यान, पाच राज्यांतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोग राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह गोठवणार का, हे पाहावे लागणार आहे. त्या दृष्टिकोनातूनच पक्षाचा निर्णय देईपर्यंत चिन्ह गोठवू नये, अशी मागणी शरद पवार गटाने केली आहे.

शिवसेनेच्या प्रकरणानुसार आम्हाला पक्ष आणि चिन्ह द्या : अजितदादा गटाची मागणी

दरम्यान, संख्याबळ आमच्याकडेच जास्त आहे. तसेच शिवसेनेच्या प्रकरणात संख्याबळ असणाऱ्या गटाला चिन्ह आणि पक्षाचे नाव मिळाले. त्यामुळे पक्ष आणि चिन्ह आम्हाला मिळावे, असा दावा अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आलेला आहे.

Election Commission Hearing
BJP Union Ministers Statement : राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत भाजपच्या केंद्रीय मंत्र्याने केला मोठा दावा...

कोअर कमिटीतील संख्याबळही आमच्याकडे जास्त आहे, असा दावाही अजित पवार गटाने केला आहे. तसेच शरद पवार यांची निवड योग्य पद्धतीने झालेली नाही. ती घटनेला धरून नाही, असा दावाही करण्यात आलेला आहे. डेलिगेटच्या नियुक्त्या बेकायदेशीर आहेत.

Election Commission Hearing
Nilesh Lanke News : ‘राहुरी'करांच्या मदतीला धावले आमदार नीलेश लंके

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com