Pune Crime Update: पुण्यातील सदाशिव पेठेत तरुणीवर झालेल्या हल्ल्यानंतर पुणे पोलीस हाय अलर्टवर आले आहे. मंगळवारी झालेल्या या घटनेनंतर पुणे पोलिसांनी शहरातील सर्व पोलीस चौक्या 24 तास सात दिवस सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रत्येक पोलीस चौकी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत आणली जाणार आहे. 150 बीट मार्शल वाढवण्यात येणार असून . त्यातील 25 बीट मार्शल हे दामिनी पथकासाठी तैनात करण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर, कोणत्याही तक्रारीकडे दुर्लक्ष न करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. (Pune Girl Attack)
पिडीत तरुणी मंगळवारी (२७ जून) सकाळी कॉलेजला निघाली होती. सदाशिव पेठेतून जात असताना हल्लेखोर तरुण मागून आला आणि त्याने अचानक तिच्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. (Pune ) पण त्यावेळी तिचा दुसरा एक मित्रही तिच्यासोबत होता. त्याने हल्लेखोराला अडवण्याचा प्रयत्न केला. त्याने पुन्हा तरुणीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण जीव मुठीत घेऊन पळाली. हल्लेखोर तरुण कोयता घेऊन तिच्यावर हल्ला करण्यासाठी मागे पळत होता. ती मदत मागत होती. पण तिच्या मदतीसाठी कुणीही पुढे आलं नाही.
तरुणी जीवाच्या आकांताने पळत होती. हा प्रकार लेशपाल जवळगे या तरुणाने पाहिला आणि जीव धोक्यात घालून तिला वाचवलं. हल्लेखोर तरुणीच्या डोक्यात वार करणार इतक्यात लेशपालने तिथे पोहचला आणि त्याचा हात रोखला. त्याच्या मदतील बाकीचे काही तरुणही धावले. तोपर्यंत पोलिसांनाही या घटनास्थळी पोहचले. तरुणांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी विश्राम बाग पोलिसांनी पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.