Pune News: 'डीआरडीओ'चे संचालक डॉ.प्रदीप कुरुलकर हे गेल्या काही दिवसांपासून तुरुंगात आहेत. हनीट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याचा गंभीर आरोप डॉ.प्रदीप कुरुलकर यांच्यावर आहे. या प्रकरणी प्रदीप कुरुलकर यांना ४ मे रोजी 'एटीएस'ने काही दिवसांपूर्वी अटक केली होती.
तेव्हापासून कुरुलकर तुरुंगात असून त्यांची चौकशी सुरू आहे. आता प्रदीप कुरुलकर हनीट्रॅप प्रकणामध्ये मोठा ट्विस्ट समोर आला आहे. कुरुलकर यांच्या चौकशी दरम्यान 'डीआरडीओ'कडून मोठी चूक झाल्याची माहिती समोर आली आहे.
'एटीएस'ने 'डीआरडीओ'कडे कुरुलकर यांचा लॅपटॉप चौकशीसाठी मागितला होता. मात्र, 'डीआरडीओ'कडून 'एटीएस'ला देण्यात आलेला लॅपटॉप हा चुकीचा असल्याचं समोर आलं आहे. 'एटीएस'ला तपासासाठी देण्यात आलेला लॅपटॉप हा चुकीचा असल्याचं एटीएसच्या लक्षात आल्यानंतर 'एटीएस'ने ही चूक 'डीआरडीओ'च्या लक्षात आणून दिली आहे.
प्रदीप कुरुलकर यांना ४ मे रोजी अटक करण्यात आलं होतं. तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. आता पुढील सुनावणी ३० जूनला होणार असून तपासामध्ये कुरुलकर अपेक्षित सहकार्य करत नसल्याचा आरोप करत पॉलीग्राफ चाचणी आणि व्हाइस लेअर अँड ॲनॅलिसिस चाचणी करण्याची मागणी एटीएसने न्यायालयाकडे केली आहे. त्यामुळे आता न्यायालय यावर काय निर्णय देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
दरम्यान, डॉ.प्रदीप कुरुलकर यांनी हनीट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे. आता या प्रकरणामध्ये त्यांनी पाकिस्तानला काय-काय गोपनीय माहिती पुरवली. तसेच परदेशात पाकिस्तानी हेरांच्या भेटी घेतल्या का? याबरोबरच जर भेटी घेतल्या असतील तर त्या कधी आणि कुठे घेतल्या, याचा अधिक तपास सध्या सुरू आहे.
Edited By : Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.