Rahul Kul News  Sarkarnama
पुणे

Rahul Kul News : देवेंद्र फडणवीसांचं आमदार राहुल कुल यांना मोठं गिफ्ट; 'हा' प्रश्न लावला मार्गी

Shinde-Fadnavis government : अनेक दिवसांपासूनचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीत राज्यातील विविध विभागातील वेगवेगळ्या विषयासंदर्भात काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2 राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयाबरोबरच पुणे जिल्ह्यातील दौंड येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) हे न्यायालय स्थापन करणे व पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. शिंदे-फडणवीस सरकारने दौंडमध्ये दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्याच्या निर्णयाला मंजूरी दिल्यामुळे अनेक दिवसांपासूनचा हा प्रश्न आता मार्गी लागणार आहे.

दौंडमध्ये दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्याचा प्रश्न शिंदे-फडणवीस सरकारने मार्गी लावत दौंड मतदारसंघाचे आमदार राहुल कुल यांना मोठं गिफ्ट दिलं आहे.

महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर राहुल कुल हे नाव चांगलच चर्चेत आलं. काही दिवसांपूर्वी विधानसभेच्या हक्कभंग समितीची स्थापना करण्यात आली. या समितीच्या प्रमुखपदी आमदार राहुल कुल यांची नियुक्ती करत त्यांना शिंदे-फडणवीस सरकारने मोठं गिफ्ट दिलं होतं.

त्यानंतर आता पुन्हा एकदा दौंडमधील दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्याचा प्रश्न मार्गी लावत शिंदे-फडणवीस सरकारने आमदार राहुल कुल यांना मोठं गिफ्ट दिलं आहे.

(Edited By Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT