Girish Bapat | Political News  Sarkarnama
पुणे

Girish Bapat News: मोठी बातमी! खासदार गिरीश बापटांची प्रकृती चिंताजनक; रुग्णालयात उपचार सुरु

Bapat Health Update : पुण्यातील मंगेशकर रूग्णालयाकडून लवकरच मेडिकल बुलेटिन जाहीर करण्यात येणार...

सरकारनामा ब्यूरो

Pune News : पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. बापट हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

खासदार गिरीश बापटां(Girish Bapat)नी यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत पुण्यातील मंगेशकर रूग्णालयाकडून तासाभरात मेडिकल बुलेटिन जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर बापट यांच्या आरोग्याविषयी अधिक माहिती मिळू शकणार आहे.

खासदार गिरीश बापट हे आयसीयूमध्ये आहेत. त्यांची परिस्थिती चिंताजनक असून ते लाईफसपोर्ट वर आहेत. दीनानाथ रुग्णालयातर्फे माहिती मंगेशकर रुग्णालयाचे अधिकारी शिरीष याडगीकर यांनी माहिती दिली आहे.

कसबा विधानसभेच्या अटीतटीच्या पोटनिवडणुकीसाठी खासदार गिरीश बापट यांनी व्हिलचेअरवरून ऑक्सिजन सपोर्टवर येऊन सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास मतदान केले होते. भाजपच्या प्रचारादरम्यान बापट यांनी आजारी असून स्वतः मैदानात उतरून पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला होता. यानंतर राष्ट्रीय अधिकार बजावण्यासाठी बापट हे मतदानासाठी पोहचले. कसबा निवडणूक भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनवली होती.

कसबा विधासनसभा मतदारसंघातून बापट १९९५ पासून सलग पाच वेळा निवडून आले आहेत. २०१९ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढविली. त्यात सुमारे ५ लाखांच्या मताधिक्याने ते विजयी झाले. तत्पूर्वी महापालिकेतही नगरसेवक म्हणून ते तीन वेळा निवडून आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT