Rahul Gandhi News: राहुल गांधी यांच्या समर्थनासाठी आता प्राध्यापक, साहित्यिक मैदानात..

Teachers and Intellectuals wrote letters in favor of Rahul Gandhi: शिक्षक, प्राध्यापक, विचारवंत, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत. त्यांनी पत्र लिहून राहुल गांधी यांना पाठिंबा दिला आहे.
Rahul Gandhi News
Rahul Gandhi News Sarkarnama
Published on
Updated on

Congress News: काँग्रेसचे नेते, माजी खासदार राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi)यांच्या समर्थनार्थ विरोधी पक्षांनी मोदी सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. 'मोदी' आडनावाबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना दोन वर्षांसाठी शिक्षा सुनावण्यात आल्याने त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.

राहुल गांधी यांना समर्थन देण्यासाठी काँग्रेसने देशभर मोदी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आता या मोहिमेत शिक्षक, प्राध्यापक, विचारवंत, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत. त्यांनी पत्र लिहून राहुल गांधी यांना पाठिंबा दिला आहे.

सुडबुद्धीनं मोदी सरकारने राहुल गांधी यांच्यावर ही कारवाई केली असल्याचे त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. मोदी सरकारने केलेली ही कारवाई लोकशाहीच्या विरोधात असल्याचे या पत्रात म्हटलं आहे. अशा प्रकारच्या कारवाईमुळे लोकशाही धोक्यात आली असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Rahul Gandhi News
Mumbai News : ठाकरे गटाच्या नेत्या Kishori Pednekar यांच्यावर गुन्हा दाखल ; BEST कर्मचाऱ्यांच्या PF वर मारला डल्ला ?

दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील प्रा. अपूर्वानंद, कवि आणि वैज्ञानिक गौहर रजा, सामाजिक कार्यकर्त्या शबनम हाशमी, निर्माता शरद राज, माजी मंत्री यशवंत सिन्हा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर, इतिहासाचे अभ्यासक इरफान हबीब यांचीही नावे या पत्रात आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून वीर सावरकरांवर टीका करत आहेत. परंतु हे प्रकरण आता वाढल्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडीत होत असल्याची चर्चा सुरू झाली होती.

Rahul Gandhi News
APP Posters Against BJP: मोदींच्या विरोधात APP ची मोहिम ; ११ भाषांमध्ये पोस्टरबाजी रंगणार

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपली नाराजी काँग्रेस नेतृत्वापर्यंत पोहोचवत एकत्र राहायचे असल्याचे सावरकरांवर वक्तव्य बंद करा, असा इशारा दिला होता. त्यामुळे महाविकास आघाडीत तणाव वाढत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) धावून आले आहेत.

शरद पवार म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सावरकर यांच्या भूमिका वेगळ्या असल्यामुळे त्यांना माफीवीर म्हणणे योग्य नाही, अशी ठाम भूमिका शरद पवार यांनी बैठकीत मांडली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकाअर्जून खर्गे यांनी पवारांच्या मताला दुजोरा दिला. त्यामुळे काँग्रेसने एक पाऊल मागे येत सावरकरांबाबत आपली भूमिका मवाळ करण्यास सहमती दर्शविल्यामुळे शरद पवार यांनी महाविकास आघाडी फुटण्यापासून वाचवली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com