Avinash bhosle  Sarkarnama
पुणे

Avinash Bhosle News : मोठी बातमी! बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंना दिलासा; अखेर जामीन मंजूर

Political News : येस बँक आणि डीएचएफएलच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी 26 मे 2022 अविनाश भोसलेंना सीबीआयने अटक केली होती. अखेर 2 वर्षांनी त्यांची कारागृहातून सुटका करण्यात आली आहे.

Sachin Waghmare

Pune News : हायकोर्टाने गेल्या काही दिवसापासून राखून ठेवलेला निकाल शुक्रवारी जाहीर केला. त्यानंतर पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना मोठा दिलासा लाभला आहे. येस बँक आणि डीएचएफएलच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अविनाश भोसले यांना एक लाखांच्या जातमुचलक्यावर अखेर जामीन मंजूर करण्यात आला.

येस बँक आणि डीएचएफएलच्या (DHFl) माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी 26 मे 2022 अविनाश भोसलेंना सीबीआयने अटक केली होती. अखेर 2 वर्षांनी त्यांची कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. येस बँक घोटाळा प्रकरणी सीबीआयनं साल 2022 मध्ये केलेल्या अटकेपासून अविनाश भोसले (Avinash Bhosle) जेलमध्येच होते. (Avinash Bhosle News)

मुंबई सत्र न्यायालयानं गेल्यावर्षी जामीन फेटाळल्यानंतर अविनाश भोसले यांनी जामीनासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती निझामुद्दीन जमादार यांच्यापुढे सुनावणी झाली. हायकोर्टाने राखून ठेवलेला निकाल शुक्रवारी जाहीर केला.

त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून अटकेत असलेल्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अविनाश भोसले यांना शुक्रवारी जामीन मंजूर झाला असून एक लाखांच्या जामीनावर त्यांची सुटका करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक अशी ओळख

अविनाश भोसले हे कोट्यवधी रूपयांच्या एबीआयएल ग्रुपचे ते मालक आहेत. ते पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. रिअल इस्टेटमध्ये त्यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. अविनाश भोसले हे माजी राज्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत.

जामीन देत असताना हायकोर्टानं काही अटी व शर्थी घातल्या आहेत. अविनाश भोसले यांना परवानगीविना देशाबाहेर जाण्यास मनाई करत तपासयंत्रणेला पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत. काहीकाळापासून भोसले हे वैद्यकीय कारणास्तव रुग्णालयातील जेलवॉर्डातच होते.

SCROLL FOR NEXT