Avinash Bhosale News : उच्च न्यायालयाचा अविनाश भोसलेंना दणका; काय आहे प्रकरण ?

High Court News : सुनावणी तहकूब केल्याने भोसलेंच्या अडचणीत वाढ
Avinash Bhosale
Avinash BhosaleSarkarnama
Published on
Updated on

Avinash Bhosale in CBI Jail : पुण्यातील मोठे बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून तातडीने दिलासा देण्यास नकार देण्यात आला. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर ६ जूनपर्यंत सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. त्यामुळे अविनाश भोसले यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. (Avinash Bosale Latest News)

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) वर्षभरातपासून 'सीबीआय'च्या (CBI) कैदेत आहेत. त्यांना २६ मे २०२२ रोजी सीबीआयने अटक केली होती. येस बँक-डीएचएफएल यांना अनियमित कर्ज दिल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. या घोटाळ्यासंबंधी त्यांना अटक करण्यात आली होती. यानंतर (ED)'ईडी'ने 'मनीलाँड्रिंग'प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यावेळेपासून अविनाश भोसले यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. सध्या ते कैदेत आहेत.

Avinash Bhosale
Maharashtra Politics: फडणवीसांचे निकटवर्तीय प्रवीण दरेकरांवर भाजपने सोपवली महत्वाची जबाबदारी!

जामीन मिळण्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात (High Court) याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर सुटीकालीन न्यायालयात सुनावणी झाली. मात्र हे प्रकरण नियमित कोर्टात वर्ग करत जूनपर्यंत या प्रकरणी ६ सुनावणी तहकूब करत तातडीने दिलासा देण्यास नकार दिला. त्यामुळे जूनपर्यंत तरी अविनाश भोसले यांना दिलासा मिळणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

Avinash Bhosale
UPSC Results : युपीएसीचा निकाल जाहीर; इशिता किशोर देशात पहिली, मुलींनी मारली बाजी..

अविनाश भोसले हे पुण्यातील मोठे बांधकाम व्यावसायिक आहेत. 'सीबीआय'ने त्यांची ४०.३४ कोटी रुपये किंमतीची स्थावर मालमत्ता जप्त केली होती. विदेशी मुद्रा प्रबंधन अधिनियमांतर्गत पुण्यातील शिवाजीनगर येथील गणेशखिंडमध्ये असलेल्या त्यांच्या एबीआयएल कंपनीच्या मुख्यालयावर 'ईडी'ने ही कारवाई केली होती.

त्यानंतर ३० एप्रिल २०२२ रोजी भोसले यांच्या पुण्यातील एबीआयएल या कार्यालयावर 'सीबीआय'कडून छापा टाकण्यात आला होता. त्यानंतर त्यांना २६ मे २०२२ रोजी अटक करण्यात आली आहे. अविनाश भोसले हे काँग्रेस नेते आणि मंत्री विश्वजीत कदम (Visjwajeet Kadam) यांचे सासरे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com