Eknath Shinde-devendra fadnavis
Eknath Shinde-devendra fadnavis  sarkarnama
पुणे

मोठी बातमी : मंत्रीमंडळाचा विस्तार होणार १९ जुलैला

सरकारनामा ब्यूरो

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार येत्या १९ जुलै रोजी होणार असल्याचे भारतीय जनता पार्टीतील (Bhartiya Janata Party) सूत्रांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात कॅबिनेट मंत्री म्हणून आठ ते दहा जणांचा समावेश होणार असल्याचे सांगण्यात येत असून यात मुख्यमंत्री शिंदे गटाचे चार ते पाच व तितकेच भाजपाचे मंत्री शपथ घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

१८ जुलैपासून विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार होते. मात्र, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमुळे मंत्रीमंडळाचा विस्तार लांबल्याचे सांगण्यात येत आहे. १८ रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान झाल्यानंतर लगेच १९ ला मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात येणार असून त्यानंतर विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात येणार आहे.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन आठ दिवस उलटून गेले. तरीही मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत कोणतीही हालचाल होत नसल्याची टीका विरोधकांकडून सुरू झाली आहे. माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गुरुवारी या विषयावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे दोघेच महाराष्ट्राचे मालक झाले आहेत, अशी टीका पवार यांनी केली आहे.

राज्यात अतिवृष्टीची परिस्थिती आहे. जनता अडचणीत आहे. मात्र, राज्यात मंत्रीच नाहीत तर पालकमंत्री कुठून येणार अशी टीका पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांनीही सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार कोणत्या गोष्टीमुळे अडला आहे. याचे नेमके कारण काय ? घोड कुठं पेंड खातयं या शब्दात अजित पवार यांनी या सरकारमध्ये सुरू झालेल्या अंतर्गत कलहाबद्दल अप्रत्यक्षरीत्या भाष्य केलं होतं.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १९ जुलै रोजी मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाचे आणि भाजपाच्या काही मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातला विस्तार होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT