'अगस्ती'सह राज्यातील तब्बल 8 हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकांना शासनाचा ब्रेक

या निवडणुकीसाठी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी आज प्रचारसभा घेतली होती.
Eknath Shinde, devendra fadnavis
Eknath Shinde, devendra fadnavis sarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर - राज्यातील आठ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगितीचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. राज्य सरकारने या निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. यात अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचाही समावेश आहे. या निवडणुकीसाठी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी आज प्रचारसभा घेतली होती. (Elections of 8,000 co-operative societies in the state including 'Agastya' postponed)

राज्य सरकरने आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अहवालानुसार राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस होत आहे. या पावसामुळे 89 व्यक्तींचे निधन झाले आहे. राज्यातील अतिवृष्टी असल्याने 249 गावे बाधित झाले आहेत. पावसामुळे होणारे नुकसान चालू राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील 8 हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. याबाबतचा आदेशच राज्य सरकारने आज काढला.

अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील मतदान अवघे दोन दिवसांवर आले असताना हा निर्णय झाला आहे. त्यामुळे उमेदवारांबरोबरच मतदारांतही नाराजी आहे. दरम्यान

Eknath Shinde, devendra fadnavis
सरकार येते जाते कोणी ताम्रपट घेऊन आला नाही : अजित दादांनी पिचड समर्थकांना सुनावले

सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार राज्यातील निवडणुकीस पात्र असणाऱ्या सहकारी संस्थांची संख्या 32 हजार 743 (250 किंवा त्यापेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था वगळून) पैकी निवडणूक प्रक्रिया सुरू असणाऱ्या 7 हजार 620 इतक्या सहकारी संस्था आहेत. उक्त निवडणूक प्रक्रिया सुरू असणाऱ्या संस्थांपैकी नामनिर्देशन सुरू असणाऱ्या सहकारी संस्था 5 हजार 636 इतक्या असून, नामनिर्देशन सुरू न झालेल्या सहकारी संस्था 1 हजार 984 इतक्या आहेत. बहुतांश सहकारी संस्था या ग्रामीण भागात असून त्यांची सदस्य संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे.

Eknath Shinde, devendra fadnavis
'अगस्ती'त पिचड चेअरमन, मग गायकर दोषी कसे? : अजित पवारांनी दिला टोला

मात्र या आदेशान्वये 250 किंवा त्यापेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच, ज्याप्रकरणी सर्वोच्च /उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेशीत केले आहे, अशा सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राज्यातील उर्वरित सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका या आदेशाच्या दिनाांकापासून ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर दिनांक 30 सप्टेंबर 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहेत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com