Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
पुणे

अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाबाबत अजित पवारांचे मोठे वक्तव्य...

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) करताना मुख्यमंत्रिपद (Chief Minister) अडीच-अडीच वर्षे असे काही ठरले नव्हते. पवारसाहेबांनी (Sharad Pawar) सांगितलं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे पाच वर्षे मुख्यमंत्री राहतील. आम्ही ते मान्य केलं, त्यानुसार आम्ही काम करतोय, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज पिंपरी चिंचवडमध्ये बोलताना सांगितले. त्यांच्या स्पष्टीकरणामुळे विविध चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे. (Big statement of Ajit Pawar regarding the post of Chief Minister)

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उदघाटनासाठी उपमुख्यमंत्री आज शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी विविध कार्यक्रम उरकून सायंकाळी पत्रकार परिषदेत घेतली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केले. त्यांनीच स्वतः यावर स्पष्टीकरण दिल्याने अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचा प्रश्नच निकाली निघाला आहे.

महाविकास आघाडी सरकारला सत्तेवर येऊन अडीच वर्षे झाली आहेत. त्यावेळी मुख्यंत्रीपदाबाबत चर्चा झाली होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद सोडणार, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री, अशा बातम्याही काही सोशल मीडियातून आल्या होत्या. मात्र, त्याला दुजोरा मिळत नव्हता. राष्ट्रवादीतही मुख्यमंत्रीपदावरून वाद असल्याचे बोलले जायचे. खासदार सुप्रिया सुळे यांचेही नाव चर्चिले गेले होते. यावर त्यांनीही स्पष्टीकरण दिले होते. मात्र, आज खुद्द अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केले आहे. त्यामुळे यापुढे या विषयावर पडदा पडण्याची चिन्हे आहेत.

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत आज दुपारपर्यंत एक अर्ज मागे न घेतल्याने सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात राहिले आहेत. त्यामुळे बिनविरोध निवडीची गेल्या २४ वर्षांची प्रथा खंडित झाली होऊन राज्यसभेसाठी १० तारखेला प्रथमच निवडणूक होणार आहे. ती बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केला, पण मार्ग निघाला नाही, अशी खंतही पवार यांनी व्यक्त केली. राज्यसभेच्या निवडणुकीत नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदान करता यावे, यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. पण, वरील दोघांना मतदान करू द्यायचे की नाही, याचा निर्णय न्यायालय देईल, असे ते म्हणाले.

आगामी पिंपरी-चिंचवड पालिका निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती होण्याची शक्यता वर्तवताना जागा वाटपाबाबत आमचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि त्यांचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर बोलणी करतील, असेही त्यांनी सांगितले. त्याचवेळी पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे, हेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT