राज्यसभा बिनविरोधसाठी प्रयत्न केले; मात्र मार्ग निघाला नाही : अजित पवारांनी व्यक्त केली खंत

बिनविरोध निवडीची गेल्या २४ वर्षांची प्रथा खंडित झाली होऊन राज्यसभेसाठी १० तारखेला प्रथमच निवडणूक होणार आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी ः राज्यसभेच्या (Rajya Sabha) महाराष्ट्रातील सहा जागांसाठी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत आज दुपारपर्यंत एक अर्ज मागे न घेतल्याने सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात राहिले आहेत. त्यामुळे बिनविरोध निवडीची गेल्या २४ वर्षांची प्रथा खंडित झाली होऊन राज्यसभेसाठी १० तारखेला प्रथमच निवडणूक होणार आहे. ती बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केला, पण मार्ग निघाला नाही, अशी खंत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (ता. ३ जून) पिंपरी-चिंचवडमध्ये व्यक्त केली. (Tried to make Rajya Sabha elections Unopposed; But no success: Ajit Pawar)

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १३ विविध विकासकामांची भूमिपूजने व उदघाटने उपमुख्यमंत्र्यांनी आज केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी वरील खंत व्यक्त केली. तसेच, या राज्यसभेच्या निवडणुकीत नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदान करता यावे, यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. पण, वरील दोघांना मतदान करू द्यायचे की नाही, याचा निर्णय न्यायालय देईल, असे ते म्हणाले.

Ajit Pawar
राष्ट्रवादीचे १०० नगरसेवक निवडून द्या; पिंपरी-चिंचवडचे सर्व प्रश्न सोडवतो : अजितदादांनी दिला शब्द!

आगामी पिंपरी-चिंचवड पालिका निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती होण्याची शक्यता वर्तवताना जागा वाटपाबाबत आमचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि त्यांचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर बोलणी करतील, असेही त्यांनी सांगितले. त्याचवेळी पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे, हेही त्यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar
‘आवताडे गटाला हरवाचायं तर जागेसाठी अडू नका अन्‌ हळकुंडासाठी लगीन मोडू नका...’

जीएसटीचा परतावा दिल्याबद्दलही त्यांनी केंद्र सरकारला धन्यवाद दिले. त्याचवेळी त्यापोटी दहा हजार कोटी रुपये आणखी बाकी आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. राज्यात लोकायुक्त नेमण्याबाबत कॅबिनेटसमोर प्रस्ताव येऊन कार्यवाही होईल, असे ते म्हणाले. कोरोना अद्याप गेला नसून तो पुन्हा वाढू लागला आहे, त्यामुळे काळजी घ्या, नाही, तर पुन्हा निर्बंध लावावे लागतील, असा इशाराही अजित पवार यांनी बोलताना दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com