Bhigwan girl abduction truth revealed sarkarnama
पुणे

Bhigwan Case: भिगवण कथित अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट! कोर्टात मुलीनं बदलली साक्ष; नेमकं काय म्हटलं? जाणून घ्या

Bhigwan Case: या मुलीनं इंदापूर कोर्टात आज व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे हजेरी लावली, यावेळी तिनं कोर्टासमोर आपला जबाब दिला आहे.

Amit Ujagare

Bhigwan Case: पुणे जिल्ह्यातील कथित अपहरण प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आला आहे. पीडित मुलीनं आता आपला जबाब बदलला आहे. या मुलीनं इंदापूर कोर्टात आज व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे हजेरी लावली, यावेळी तिनं कोर्टासमोर आपला जबाब दिला आहे. त्यामुळं आता या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं आहे.

प्रकरण नेमकं काय?

भिगवण येथील एका महिलेनं आपल्या मुलीचं काही लोकांनी अपहरण केल्याचा दावा केला होता. यामध्ये मुलगी आपली आई आणि भावासोबत गाडीवरुन जात असताना आई आणि भावाच्या डोळ्यात मिरपूड टाकून मुलीला पळवून नेल्याची तक्रार तिच्या आईनं भिगवण पोलिसांत दिली होती. त्यानुसार यात अपहरणाचा गुन्हाही दाखल झाला होता. यामुळं मोठी खळबळ माजली होती, भिगवणमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक गोळा झाले होते, त्यात भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी देखील तिथं हजेरी लावत सभा घेण्याची तयारी सुरु केली होती. पण पोलिसांनी त्यांच्या सभेला परवानगी नाकारली होती. कारण पडळकरांनी हे प्रकरण लव-जिहादचं प्रकरण असल्याचा आरोप केला होता.

प्रकरणात पहिला ट्विस्ट

हे सगळं सुरु असतानाच याप्रकरणात पहिला ट्विस्ट आला होता. तो म्हणजे संबंधित मुलीचा एक व्हिडिओ समोर आला होता, यात तिनं आपल्या आईनं दिलेल्या साक्षीनुसार काहीही घडलेलं नसून आपण स्वतःहूनच आपल्या प्रियकरासोबत निघून गेल्याचं तिनं म्हटलं होतं. या व्हिडिओत ती आणि तीचा प्रियकर हे दोघेही दिसत होते, तसंच आपल्याला आईसोबत जायचं नसून प्रियकरासोबतच राहायचं असल्याचं म्हटलं होतं. यानंतर हे दोघेही बारामती पोलिसांसमोर हजर झाले होते. यावेळी पोलिसांनी तिला पुनर्वसन केंद्रात ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर संबंधित मुलीनं विविध माध्यमांच्या प्रतिनिधींसमोरही हाच जबाब कायम ठेवला होता. त्यामुळं याप्रकरणात अपहरण झाल्याच्या चर्चेची हवाच निघून गेली. पण तरीही ग्रामस्थ आक्रमक झाले होते.

मुलीनं बदलली साक्ष

दरम्यान, या प्रकरणात आज मुलीला इंदापूरच्या कोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे हजर करण्यात आलं. यावेळी मात्र मुलीनं आपल्याला आईसोबतच राहायचं असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं आधी तिनं प्रियकरासोबत जायचं असल्याचं म्हटलं होतं या साक्षीविरोधात आज तिनं साक्ष बदलल्यानं या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. कारण यापूर्वी हिंदुत्ववादी संघटनांनी आरोप केला होती की, मुलगी दबावाखाली असल्यानं मुलासोबतच रहायचं असल्याचं म्हणत आहे. पण आता तिनंच आपली साक्ष बदलल्यानं आता ती कोणाच्या दबावाखील बोलत आहे की आधी ती कोणाच्या दबावाखाली बोलत होती, हे पुढील तपासादरम्यान समोर येईल. त्याप्रमाणेच हा खटला पुढे जाईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT