Sharad Pawar threat Case News Update : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना दोन दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. ट्विटरच्या 'नर्मदाबाई पटवर्धन' नावाच्या अकाउंटवरुन ही धमकी देण्यात आली होती. आज सकाळी या प्रकरणी पुणे पोलिसांनी पुण्यातून सागर बर्वे नावाच्या तरुणाला अटक केली. याप्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
मुंबई पोलिसांंनी त्याला ताब्यात घेत मुंबईला नेले आणि न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सागर बर्वेला मंगळवार (१३ जून) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. ३४ वर्षीय बर्वे ट्विटरवर नर्मदाबाई पटवर्धन या नावाने फेसबुक अकाऊंट चालवतो. दोन दिवसांपूर्वी त्याने आपल्या पोस्टमध्ये शरद पवार यांना उद्देशून 'तुझा लवकरच दाभोलकर होणार', अशी धमकी दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी आज सकाळी सागर बर्वेला अटक केली. (Sharad Pawar Threat Case)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,धमक्या देण्यासाठी त्याने ट्विटरवर दोन बनावट खाती तयार केली होती. तर दुसरीकडे शरद पवार यांना आलेल्या धमक्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांना त्यांच्या सरक्षेत वाढ करण्याचेही निर्देश दिले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसशी वैचारिक मतभेद असले तरी विरोधी नेत्यांना धमक्या खपवून घेणार असल्याचे म्हटले होते. (Maharashtra politics)
फेसबुक आणि ट्विटरसह सोशल मीडियावर जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली. फेसबूकपोस्टमध्ये शरद पवार यांना उद्देशून 'तुझा लवकरच दाभोलकर होणार', अशी धमकी देण्यात आली होती. फेसबुकवर धमकी दिल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने शुक्रवारी लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल केला होता. (Political news)
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.