Sharad Pawar Threat Case : शरद पवार धमकी प्रकरणी पुण्यातून एका आयटी इंजिनिअरला अटक ; दोन्ही अकाउंट..

NCP News : आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी काही तांत्रिक बाबींचा आधार घेतला.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune news : " 'नर्मदाबाई पटवर्धन' या नावाच्या अकाउंटवरुन दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

याप्रकरणी पुण्यातून एक तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याला मंगळवारपर्यंत (ता.१३) पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी काही तांत्रिक बाबींचा आधार घेतला.

सागर बर्वे (वय 34) असं पवारांना धमकी देणाऱ्या आरोपीचं नाव असल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले. फेसबूकपोस्टमध्ये शरद पवार यांना उद्देशून 'तुझा लवकरच दाभोलकर होणार', अशी धमकी देण्यात आली होती.

याप्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा, खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिसांकडे लेखी तक्रार केली आहे . रविवारी मुंबई गुन्हे शाखेच्या (Mumbai Crime Branch)पथकाने सागर बर्वे याला पु्ण्यातून अटक केली. सागर हा आयटी इंजिनिअर आहे.

Sharad Pawar
Supriya Sule : राष्ट्रवादीच्या नवनियुक्त कार्यकारी अध्यक्षा सुळे कुणाला रिपोर्टिंग करणार ? ; सुळे म्हणाल्या..

शरद पवार यांना समाज माध्यमांमधून धमकी मिळाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. पवारांना धमकी देणाऱ्या ट्विटर हँडलवर कारवाई करावी अशी मागणी सुळे यांनी केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ दखल घेत तपास सुरू केला. अखेर आरोपीला बेड्या ठोकण्यात गुन्हे शाखेला यश आलं आहे.

'नर्मदाबाई पटवर्धन' या नावाच्या अकाउंटवरुन शरद पवार यांना उद्देशून 'तुझा लवकरच दाभोलकर होणार', अशी धमकी देण्यात आली होती. तर सौरभ पिंपळकर नावाच्या ट्विटर हँडलवरुन शरद पवार यांची औरंगजेबासोबत तुलना करत आक्षेपार्ह भाषेचा वापर केलेला मजकूर प्रसिद्ध करण्यात आला होता. आरोपी सागर बर्वे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असून त्यानेच दोन्ही अकाउंट तयार केल्याचा पोलिसांना संशय आहे.

Sharad Pawar
Sanjay Raut Slams Amit Shah : 'ये डर अच्छा है..; शाहांच्या ठाकरेंवरील टीकेला राऊतांचे सडेतोड उत्तर, मातोश्रीचा धसका...

शरद पवार यांना धमकी आल्याने खळबळ उडाली असतानाच शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि सुनील राऊत यांनाही धमकीचे फोन आले आहेत. सुनील राऊत यांच्या फोनवर अज्ञाताने कॉल करुन दोघाही भावांना गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहेत. एकाच दिवशी राज्यातील तीन दिग्गज नेत्यांना धमक्या आल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा रंगल्या आहेत. (Latest Marathi News)

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com