ncp
ncp sarkarnama
पुणे

किक्रेटनामाच्या पहिल्या चषकावर राष्ट्रवादीचे नाव; प्रशांत जगताप-अनिकेत तटकरे ठरले विजयाचे शिल्पकार

सरकारनामा ब्यूरो

पुणे : बलाढ्य फलंदाज आणि तिरकस गोलंदाजांची मोट बांधल्याने चुरशीच्या ठरलेल्या अंतिम फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP), शिवसेनेला (Shivsena) नमवून सरकारनामाचा चषक जिंकला. शिवसेनेपुढे ४८ धावांचा डोंगर उभा केलेल्या राष्ट्रवादीने शिवसेनेला २६ धावांच्या पुढे जाऊ दिले नाही. हा सामना राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेचा करुन दोन्ही संघाने डावपेच रचल्याने चुरस निर्माण झाली होती. मात्र, राष्ट्रवादीने फलदांजी आणि गोलंदाजीही उजवी करून शिवसेनेची कोंडी केली आणि शिवसेनेलाही राष्ट्रवादीच्या चालीतून विजयाकडे जाण्यात अपयश आले. या रोमांचक लढतीने सरकारनामाच्या स्पर्धेची सांगताही झाली.

सरकारनामामाने भरविलेल्या सामन्याचा चषक कोण जिंकणार यांची प्रचंड उत्सुकता होती. अंतिम फेरीत राष्ट्रवादी आणि शिवसेना आमने-सामने आले. पहिल्यांदा फलंदाजी करुन राष्ट्रवादीने ४८ धावांचे टार्गेट शिवसेनेपुढे ठेवले. त्यात आमदार अनिकेत तटकरे (Aniket Tatkare) यांनी जबरदस्त खेळी करत राष्ट्रवादीला विजयाच्या उंबरठ्यावर नेवून ठेवले.

त्यानंतर मैदानात उतरलेल्या शिवसेनेने जिंकण्याचा डाव रचला पण पहिल्याच चेंडूत शिवसेनेचा खेळाडू तंबूत परतला. त्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जोरदार झुंज दिली. मात्र, तेही ११ चेंडूत १४ धावा करत विजयांच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या.

मात्र, ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्या शिवाय एकही खेळाडू मैदानावर धावा करु शकला नाही. शिवसेनेच्या एकामागे एक खेळाडू तंबूत परतले. राष्ट्रवादीने प्रशात जगताप यांच्या नेतृत्वात जबरदस्त फिलडिंग लावली. त्यामुळे शिवसेनेला त्यांनी नमवले. शिवसेना नेते सचिन अहिर (Sachin Ahir) यांच्या नेतृत्वात शिवसेनेने फायनलमध्ये प्रवेश केला. मात्र, फायनलमध्ये झालेल्या लढतीत त्यांना अपयश आले, असले तरी त्यांनी जोरदार झुंज दिली.

सरकारनामाच्या या स्पर्धेकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. या विजयानंतर बोलताना राष्ट्रवादीचे कॅप्टन आणि पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी फायनल आम्ही जिंकला, आता पुणे महापालिकाही राष्ट्रवादीच जिंकणार असे सांगितले. त्यानंतर राष्ट्रवादीने मैदानावर मोठा जल्लोष केला. या संपूर्ण स्पर्धेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिकेत तटकरे आणि शिवसेनेकडून ओमराजे निंबाळकर यांनी जोरदार खेळी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT