Cricketnama : सचिन अहिरांच्या नेतृत्वात शिवसेनेचा दणदणीत विजय; मनसेला नमवत फायनलमध्ये प्रवेश

सचिन अहिरांना (Sachin Ahir) खांद्यावर घेत शिवसेनेच्या टीमचा जल्लोष
Sachin Ahir
Sachin Ahirsarkarnama
Published on
Updated on

पुणे : राजकीय मैदाना पाठोपाठ सरकारनामाच्या मैदानावरही शिवसेना (Shivsena) आणि मनसेतील (Mns) संघर्ष अधिक रंजक ठरला. शिवसेनेच्या गोलनदाजांचा एकही चेंडून न सोडण्याची रणनिती आखलेल्या मनसेला शिवसेनेने २७ धावांवर रोखले, मनसेने उभे केलेले हे आव्हान सहज मोडीत काढले आणि मैदान गाजवून अंतिम फेरी गाठली. प्रेक्षकांच्या नजरा रोखून घेतलेल्या शिवसेना-मनसे लढाईत शिवसैनिकांनी शेवटच्या क्षणी षटकार मारून विजयाची पताका रोवली. या निमित्ताने मैदानावर फगवा जल्लोष पाह्यला मिळाला.

Sachin Ahir
सचिन अहिरांनी केली नांदगावकरांवर मात: ओमराजे निंबाळकर ठरले हिरो

सरकारनामाच्या सामन्यात एका अर्थाने मातोश्री यांच्या खडजंगी होणार आणि कोण बाजी मारणार याची मोठी उत्सुकता होती. या सामन्याकडे महाविकास आघाडीतील घटक पक्षांसह सर्वाचे लक्ष लागले होते. अखेर या दोन्ही सामन्यांची सुरुवात झाली, त्या त्या संघाच्या खेळाडूंनी विजयासाठी फिल्डिंग लावली होती. त्यात शिवसेनेचे नेते सचिन आहिर (Sachin Ahir) यांच्या नेतृत्वात उतरलेल्या सेनेने विजयी घोडदौड कायम ठेवली. साईनाथ बाबार यांच्या मनसेनेही शिवसेनेला गारद करायचा निच्छय केला होता. मात्र, शिवसेनेने मनसेला गारद केले. या विजया सह शिवसेनेने फायनलमध्ये प्रवेश केला.

शिवसेनेने टॉस जिंकला मात्र, त्यांनी पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला. मनसेची बॅटिंग सुरु होताच आधिच्या सामन्यात नायक ठरलेल्या बाबू वागस्कर यांनी आपली विकेट ससत्यात दिली. मनसेची सुरुवात अडखळत झाली. मनसेने ६ षटकांमध्ये केवळ २७ धावा उभारल्या. शिवसेनेकडून सचिन खैरे आणि योगेश मोकाटे मैदानात उतरले. शिवसेनेचीही सुरुवात अडखळत झाली.

Sachin Ahir
Cricketnama : मनसेने केला 'आप'चा झाडून पराभव; बाबू वागस्करांची जोरदार बॅटींग

किशोर शिंदे यांनी जोरदार बॉलिंग करत शिवसेनेला केली. मात्र, त्यानंतर नियमीत प्रमाणे ओमराजे निंबळकर यांनी टीमला सावरले. त्यानंतर शिवसेनेचे आकाश शिंदे यांनी सनसनीत षटकार खेतच सेनेला विजयी केले. शिवसेनेने दणदणीत विजय मिळवल्यानंतर, सचिन अहिरांना खांद्यावर घेत मैदानावर मोठा जल्लोष केला. त्यांनी फायनलमध्ये प्रवेश केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com