Abhijit Bichukale Sarkarnama
पुणे

Abhijit Bichukale : 'ईव्हीएम'मध्ये गडबड; बिचकुले म्हणाले, 'माझ्यासोबत हजार जणांनी फोटो काढले, मग मला 200 तरी...'

Bigg Boss fame Abhijit Bichukale EVM machine Pune Sharad Pawar : 'ईव्हीएम'च्या लढाईमध्ये मी शरद पवारसाहेबांसोबत असल्याचे असून, बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी 'ईव्हीएम'विरोधातील लढ्यात उतरणार असल्याचे सांगितले.

Sudesh Mitkar

Pune News : विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड, असं यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते सातत्याने 'ईव्हीएम'बाबत शंका उपस्थित करत आहेत.

'ईव्हीएम'मध्ये गडबड असून या गडबडीमुळेच महायुतीला इतकं मोठं प्रचंड यश मिळालं असल्याचा दावा महाविकास आघाडीचे नेते करताना दिसत आहेत. अशातच आता 'बिग बॉस फेम' अभिजीत बिचुकले यांनी देखील 'ईव्हीएम'वर शंका उपस्थित केली आहे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अभिजीत बिचुकले हे बारामती (Baramati) विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढले होते. बारामतीमध्ये यंदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार, तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून योगेंद्र पवार निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीत अजित पवार यांचा एक लाखाहून अधिक मतांनी विजय झाला, तर अभिजीत बिचुकले यांना 92 मत मिळाली. नंतर त्यांनी देखील 'Evm' बाबत शंका उपस्थित केली आहे.

पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना अभिजीत बिचुकले म्हणाले, "सध्या सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची एक क्लिप पाहायला मिळत आहे. त्यामध्ये ते बॅलेट पेपरवर मतदान घेण्याबाबत बोलत आहेत. मात्र आता त्यांना त्याचा विसर पडला असून ते 'ईव्हीएम'बाबत आग्रही आहेत". अमेरिकीसारखा देशात देखील बॅलेट पेपरवरती निवडणुका होतात. त्यांच्यासारख्या विकसित देशांमध्ये अशा प्रकारे निवडणुका होत असतील तर आपल्यासारख्या प्रगतशील देशांमध्ये 'ईव्हीएम'चा आग्रह का?, असा बिचुकले यांनी उपस्थित केला.

पवार यांच्या पक्षाच पराभव, अशक्य...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांच्या पक्षाचा इतका दारुण पराभव होईल, असं वाटत नव्हतं. विरोधकांना किमान शंभर तरी जागा मिळणे अपेक्षित होतं. जर आता शरद पवार 'ईव्हीएम'बाबत बोलत असतील, तर ते गंभीर असल्याचं बिचुकले यांनी सांगितलं.

पवारांच्या लढ्यात मी देखील असेल...

बिचुकले पुढे म्हणाले, "महाराष्ट्रामध्ये माझं स्टार ड्रम मोठा आहे. मी कुठेही दिसलो की माझ्या आजूबाजूला शंभर लोक फोटो काढण्यासाठी गर्दी करतात. बारामतीमध्ये निवडणुकीदरम्यान देखील अजित पवार आणि शरद पवार गटातील कार्यकर्ते देखील त्यांच्या त्यांच्या पक्षाचे बॅच आणि उपरणं बाजूला ठेवून माझ्यासोबत फोटो काढत होते". निवडणुकी दरम्यान बारामतीमध्ये माझ्यासोबत किमान हजार फोटो काढण्यात आले. मला कमीत कमी 200 मत तरी पडायला हवी होती ती पडली नाहीत. म्हणजे 'ईव्हीएम'मध्ये घोटाळा आहे, असा दावा अभिजीत बिचुकले यांनी केला. 'ईव्हीएम'विरोधात शरद पवार जर लढा उभारणार असतील, तर त्यांच्यासोबत या 'ईव्हीएम'च्या लढ्यामध्ये मी देखील माझ्या टेक्निकल टीम सोबत असेल, असं अभिजीत बिचुकले यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT