Aditya Thackeray : अखिलेशजींची लढाई सुरू आहे, पण अबू आझमी कोणाची टीम? आदित्य ठाकरेंनी थेट सांगितलं

ShivSenaUBT party MLA Aditya Thackeray Mumbai Samajwadi Party Abu Azmi BJP : हिंदुत्वाच्या मुद्यावर उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर टीका करत 'मविआ'तून बाहेर पडलेल्या अबू आझमींना आदित्य ठाकरेंना चांगलेच सुनावले.
Aditya Thackeray 2
Aditya Thackeray 2Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर आक्षेप घेत मविआतून बाहेर पडले. समाजवादी पक्षाचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी तशी घोषणा केली.

यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेचे प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी अबू आझमी कोणाची टीम आहे, हे थेट सांगितले.

'महाराष्ट्रातील समाजवादी पक्ष हा भाजपची (BJP) 'बी' टीम म्हणून काम करते', असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला. ते म्हणाले, अखिलेश यादवजी यात कोठेच नाहीत. ते त्यांची लढाई लढत आहेत. अबू आझमी यांचे नाव टाळून या निवडणुकीत त्यांनी कोणाला मदत, यावर मला जास्त बोलायला लावू नका. मी बोलणार पण नाही. आमची हिंदुत्ववादी भूमिका पूर्वीसारखीच आहे. आमचे हिंदुत्व घरातील चूल पेटवणारे आहे. इतरांसारखे घर पेटवणारे नाही. 'हृदय मे राम, हाथ को काम', असे आमचे हिंदुत्व आहे".

Aditya Thackeray 2
Sadabhau Khot : कौतुकाचे गोडवे गाणारे खोत अचानक महायुतीवर घसरले; राऊतांना दिली 'ही' उपमा

'सबका साथ, सबका विकास', अशी घोषणा भाजपने दिली होती. पण प्रत्यक्षात तसे होत नाही. त्यावर आम्ही काम करत आहोत. महाराष्ट्रातील, देशातील प्रत्येका समाजाला समावून घेण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हिंदुत्व पुढे घेऊन जाण्याचे काम करत आहेत, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

Aditya Thackeray 2
Top 10 News : जानकर देणार राजीनामा, नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष? - वाचा महत्वाच्या घडामोडी

निवडणूक आयोग सत्तामेववर काम करतेय

आदित्य ठाकरेंनी यावेळी निवडणूक आयोगावर जोरदार टीकास्त्र सोडले. "निवडणूक आयोगाकडून ही निवडणूक प्रक्रिया कशी पार पाडली याचे उत्तर अपेक्षित आहे. लोकशाहीमध्ये जनतेचा आवाज महत्त्वाचा असतो. परंतु निवडणूक आयोग सध्या भाजपच्या कार्यालयातून चालत आहे. मारकडवाडी गावातील ग्रामस्थांची घेतलेला माॅक पोल झाला असताना, तर निवडणुकीतील सत्य समोर आले असते. परंतु इथं जनतेचा आवाज दाबला जात आहे. देश सत्यमेव जयतेवर चालतो, सत्तामेववर चालत नाही. निवडणूक आयोग सध्या सत्तामेववर काम करत आहे", असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.

हंसी-मजाक चाललाय का?

"मरकवाडीमध्ये माॅक पोलची मागणी जिंकून आणलेला आमदार करत आहेत. आमदार म्हणून काम करत आहेत. बॅलेट पेपर मतदानासाठी आता आंदोलन पेटले आहे. ते पुढं चालू राहणार आहे. आमदार झालो म्हणून शांत बसणार नाही. बॅलेट पेपरसाठी लढाई सुरू राहणार आहे. सुनील राऊत यांनी बॅलेटवर निवडणुकीसाठी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे, यावर ही सर्वांचीच इच्छा आहे. शेवटच्या तासात किती मतदान झाले, याची उत्तर निवडणूक आयोगाने दिले पाहिजे. जनतेला तरी उत्तर द्यावे. टीका नको नुसती. हंसी-मजाक करायचे आहे, तर कपिल शर्मा-शोमध्ये जावे", असा टोला आदित्य ठाकरेंनी निवडणूक आयोगाला लगावला.

इंडिया आघाडीचा नेता कोण?

इंडिया आघाडीचे नेतृत्व कोण करणार, यावर आदित्य ठाकरे यांनी इंडिया आघाडी देशासाठी, संविधानासाठी, जनतेच्या आवाजासाठी लढत आहे. ममता दीदी उत्कृष्ट नेता आहे. अरविंज केजरीवाल यांना चर्चेत समावून घेतले जात आहे. वरिष्ठ नेते यावर चर्चा करत आहेत. इंडिया आघाडी लवकर देशात सत्तेत येईल, असे वातावरण तयार झाले आहे. येणारी सत्ता इंडिया आघाडीचे असेल, असा दावा केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com