Pune News : बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांमधील पोटनिवडणुकीच्या प्रचार मोहिमेसाठी भाजपाच्या केंद्रीय कार्यालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. ही यादी निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली आहे. मात्र, या यादीतील काही नावांची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभाच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मैदानात उतरले असून सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले.
असं असलं तरी या जागेवर काँग्रेसने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र आज शेवटच्या दिवशी वरिष्ठांच्या सूचनेवरून काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतला आहे. असं असलं तरी या सर्व घडामोडींमध्ये अपक्षांनी भरलेल्या अर्ज माघारी घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून जास्त प्रयत्न करण्यात आल्याचं पाहायला मिळाले नाही.
त्यामुळे या निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध अपक्ष अशी लढत होणार आहे. या लढतीमध्ये भाजप आपल्या नेत्यांची फौज प्रचारासाठी उतरवणार असल्याचं समोर आला आहे. त्याबाबतची 40 जणांची यादी भाजपने निवडणूक आयोगाला दिली आहे.
या यादीमध्ये गोपीचंद पडळकर यांचं नाव पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. गोपीचंद पडळकर हे सातत्याने पवार कुटुंबावर टीका टिप्पणी करताना पाहायला मिळतात. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सातत्याने टीका करणारे गोपीचंद पडळकर हे महायुतीत असताना अजित पवार यांच्यावर टीका करताना पाहायला मिळाले होते.
तसेच त्यांनी भाजपकडून अजित पवार यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक देखील लढवली होती. त्यामुळे त्यांनी बारामतीमध्ये पवार कुटुंबाच्या विरोधात आपल्याला मतदान करावं अशी मतदारांना आव्हान देखील केलं होतं. तसेच ते सातत्याने पवार कुटुंबा विरोधात आक्रमक भूमिका घेतात अशा परिस्थितीत गोपीचंद पडळकर हे बारामतीच्या मैदानात उतरून सुनेत्रा पवार यांच्यासाठी मत मागणार असल्याने पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे.
स्टार प्रचारकांच्या यादीत कोण कोण...?
या स्टार प्रचारकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, नितीन गडकरी, शिव प्रकाश, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, अशोक चव्हाण, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांतदादा पाटील, रावसाहेब दानवे पाटील, प्रा. राम शिंदे, ॲड. आशिष शेलार, राधाकृष्ण विखे पाटील, मुरलीधर मोहोळ, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, गणेश नाईक, उदयन राजे भोसले, जयकुमार रावल, शिवेंद्रराजे भोसले, नितेश राणे, जयकुमार गोरे, अतुल सावे, मेघना बोर्डीकर, अशोक उईके, चित्रा वाघ, प्रवीण दरेकर, डॉ. भागवत कराड, गोपीचंद पडळकर, डॉ. संजय कुटे, धनंजय महाडिक, मायाताई इवनाते, भारती पवार, रामराव वडकुते, डॉ. सुजय विखे पाटील, योगश टिळेकर, अमित गोरखे, मोनिका राजळे, राहुल कुल आणि इद्रीस मुलतानी या नेत्यांचा समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.