Devendra Fadnavis On ladki bahin sarkarnama
पुणे

Video Devendra Fadnavis : 'लाडकी बहीण'च्या विरोधात स्ट्रॅटेजी ठरली; देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली भीती

Roshan More

Devendra Fadnavis News : विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लोकसभेत अवघ्या दोन लाख मतांचा फरक महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये होता. मात्र, ही दोन लाख मतं आम्ही लाडकी बहीण योजनेच्या घोषणेतूनच मिळवली, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

लाडकी बहीण योजनेला विधानसभेत विरोधकांनी विरोध केला. त्या विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी करत आहेत. पण गावात या योजनेचे पहिले पोस्टर यांनीच लावला आणि खाली आपला फोटो लावला, असे म्हणत विरोधकांवर देवेंद्र फडणवीसांनी निशाणा साधला.

लाडकी बहीण योजने विरोधात विरोधकांची स्ट्रॅटेजी ठरली आहे. ते महिलांकडून फाॅर्म भरून घेणार आहेत. ते फाॅर्म सबमिट करणार नाहीत. त्यामुळे महिलांना लाभ मिळणार नाही. उलट विरोधकांकडून महिलांच्या मनात रोष निर्माण केला जाणार की लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळत नाही.', असा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला.

महिलांना लाभ मिळणार नाही, यात आमचा दोष असणार नाही. कारण विरोधकांकडूनच खोटे फाॅर्म भरून दुरुपयोग केला जाणार, असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

भाजप कार्यकर्त्यांना आवाहन

लाडकी बहीण योजना ही आपल्या सरकारची आहे. मैदानात उतरून भाजप कार्यकर्त्यांनी त्याचा प्रचार करायला पाहिजे. आपल्याला ही योजना कशी यशस्वी होईल हे पाहिले पाहिजे, असे आवाहन फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केले.

आदेशाची वाट पाहू नका

'विरोधकांना उत्तर देण्यासाठी आदेशाची वाट पाहू नका. मैदानात उतरा आणि ठोकून काढा. ज्याल बॅटींग करायची त्याने करावी पण अट एकच हिट विकेट होऊ नका. कारण समोरच्यावर बोलण्यापेक्षा आपल्यावर बोलला तर पुढीच चार दिवस त्याचे उत्तर देत बसावे लागेल.'असे फडणवीस म्हणाले. फेक नेरेटिव्हला फेक नेरेटिव्हने उत्तर देऊ. विरोधकांच्या खोट्या नेरेटिव्हला बळी पडू नका, असे आवाहन देखील फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT