Video BJP Adhiveshan : अन् फडणवीसांनी थेट तारीखच दिली!; भाजपच्या अधिवेशनात केली मोठी भविष्यवाणी

BJP strategy for Maharashtra assembly election : भारतीय जनता पक्षाचे आगामी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग पुण्यातून फुंकलं आहे. यासाठी भाजपने आज रविवारी (ता.21) रोजी पुण्यातील बालेवाडी येथे एक दिवशीय अधिवेशन आयोजित केलं आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 21 July : भारतीय जनता पक्षाचे (BJP) आगामी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग पुण्यातून फुंकलं आहे. यासाठी भाजपने आज रविवारी (ता.21) रोजी पुण्यातील बालेवाडी येथे एक दिवशीय अधिवेशन आयोजित केलं आहे. या अधिवेशनाला राज्यातील मंत्र्यासह केंद्रीय मंत्र्यांसह राज्यभरातील हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते या अधिवेशानासाठी उपस्थित आहेत.

याच कार्यकर्त्यांसमोर राज्याचे उपमुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस राज्यात पुन्हा एकदा महायुतीचंच सरकार येणार हे लिहून ठेवा, असा दावा केला आहे. तसंच त्यांनी राज्यातील जनता आपल्याच पाठीशी असल्याचंही म्हटलं आहे.

अधिवेशनात बोलताना फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, "सध्या चातुर्मास सुरु आहे. हा मास तपश्चर्येचा आहे. या मासाचा संपर्क, संवाद आणि तपस्येसाठी उपयोग करायचा असतो. आपणाला हा चातुर्मास समर्पनाचा म्हणून साजरा करायचा आहे. मी आधीच सांगितलं या अधिवेशनाचं हे स्थान ऐतिहासिक आहे.

चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं 2013 ला असंच अधिवेशन घेतलं आणि 2014 ला आपण पूर्ण बहुमताने निवडून आलो. पुन्हा इथेच अधिवेशन घेतोय आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो, आजची तारीख लिहून ठेवा, देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं लिहून ठेवा. या विधानसभेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात महायुतीचचं सरकार निवडून येईल." असा दावा फडणवीसांनी यावेळी केला.

भाजपचा विचार गावागावपर्यंत पोहचवा

तसंच ते म्हणाले, "ही पुण्यभूमी (Pune) आहे. महाराजांच्या पायाने पावन झालेली, शिक्षणाचं माहेर घर असणारी, समाजसुधारकांचं माहेरघर असणारी ही भूमी आहे. इथला विचार गावागावपर्यंत पोहोचतो. भाजपचा विचार गावागावपर्यंत पोहचवण्यासाठी आपण इथे जमलो आहोत. आपण 2014, 2019, 2024 सालची निवडणूक लढलो 2014 ला लोकांचा निर्धार बघितला 2019 लोकांचा पाठींबा बघितला आणि 2024 ला देखील जनता आपल्याच पाठीशी होती," असंही फडणवीस म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com