Ajit Pawar Ashish Shelar sarkarnama
पुणे

अजितदादा, माझ्या नादाला लागू नका ; “जो मैं बोलता हूँ, वो करता हूँ”

अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर आशिष शेलार यांनी (Ashish Shelar) अप्रत्यक्षपणे टीका केली. “जेव्हा निवडणूक लागेल, तेव्हा मावळमधला आमदार भाजपाचाच (BJP) असला पाहिजे,'' असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सरकारनामा ब्युरो

पुणे : “ज्या पद्धतीने तीन पक्षांत आपापसात विसंवादाची रोज लढाई लागली आहे आणि त्या तीन पक्षातल्या दोन पक्षांचे जे संकेत आमच्याकडे येत आहेत, या सगळ्याचा अभ्यास केला तर अनुमान असं काढता येऊ शकतं की राज्यात केव्हाही निवडणूक लागू शकेल”, असं विधान भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मावळ(पुणे) येथे केलं. भाजपाच्या पदाधिकारी-कार्यकर्ता मेळाव्यामध्ये शेलार बोलत होते.

शेलारांनी यावेळी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. मावळमध्ये शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबार प्रकरणी देखील आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. शेलार म्हणाले, “मावळ शेतकरी गोळीबारात तीन शेतकरी मारले गेले. १८५ शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याचं काम फडणवीस सरकार केलं आहे. ज्याने गोळ्या झाडल्या त्याला आज मुंबईमध्ये प्राईम पोस्टिंग दिली आहे. मावळ मधील शेतकऱ्यांचे खरे शत्रू कोण हे आज पुन्हा एकदा सांगायचं आहे”

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर शेलारांनी अप्रत्यक्षपणे टीका केली. शेलार म्हणाले, "जो मैं बोलता हूं वही करता हूं, और जो मैं नहीं बोलता, वो डेफिनेटली करता हूं. त्यामुळे माझ्या नादाला लागू नका, पालकमंत्र्यांनी आणि आमदारांनी हे लक्षात ठेवावं.'' “जेव्हा निवडणूक लागेल, तेव्हा मावळमधला आमदार भाजपाचाच (BJP) असला पाहिजे,'' असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT