शिवसेनेशी पंगा घेणारी अभिनेत्री बनली भाजपची ब्रँड अॅम्बेसिडर

उत्तर प्रदेश सरकारने कंगनाला (kangana ranaut) ODOP (वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट)ची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषित केलं आहे.

शिवसेनेशी पंगा घेणारी अभिनेत्री बनली भाजपची ब्रँड अॅम्बेसिडर
Published on
Updated on

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशाच्या एका महत्वाच्या मोहिमला आता वेग मिळणार आहे, कारण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सत्ताधारी शिवसेनेसोबत पंगा घेणारी अभिनेत्री कंगना राणावत हीची या मोहीमेसाठी ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून निवड केली आहे. कंगनाने काल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.

उत्तर प्रदेश सरकारने कंगनाला (kangana ranaut) ODOP (वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट)ची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषित केलं आहे. काल कंगनानं योगी आदित्यनाथ (cm yogi adityanath) यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली. या भेटीदरम्यान योगी आदित्यनाथ यांनी कंगनाला एक विशेष वस्तू भेट म्हणून दिली आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनावेळी वापरण्यात आलेलं नाणं मुख्यमंत्र्यांनी कंगनाला दिलं.


शिवसेनेशी पंगा घेणारी अभिनेत्री बनली भाजपची ब्रँड अॅम्बेसिडर
माझ्यावर कटकारस्थान करणाऱ्यांवर कारवाई कधी ? सोमय्यांचा सवाल

वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट या मोहिमेमध्ये उत्तर प्रदेशमधील स्थानिक कारागिरीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्याची विशेष हस्तकला किंवा कारागिरी त्या जिल्ह्याची विशेषता म्हणून लोकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. या मोहिमेच्या मोठा कार्यक्रम लवकरच आयोजित केला जाणार असल्याचे उत्तरप्रदेश सरकारकडून सांगण्यात आले. कंगनाची प्रमुख भूमिका असलेला थलैवी चित्रपट ओटीटीवर नुकताच प्रदर्शित झाला आहे. कंगना तिच्या नव्या चित्रपटाचं चित्रीकरण व्यग्र आहे. काल शुटींग संपवून ती लखनौला आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com