शिरुर : महाविकास आघाडी सरकारमधील (MahaVikas Aghadi) नेते विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर नेहमीच टीका करीत असतात. 'अकेला देवेंद्र क्या करगा,' अशी टीका ते करीत असतात. त्याला भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उत्तर दिलं आहे. त्या शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे महिला मेळाव्यात बोलत होत्या. (Chitra Wagh news )
"राज्यात महाविकास आघाडीच्या तीन पक्षांची ताकद असताना 'अकेला देवेंद्र क्या करेगा असं म्हणताय! आरे, एकट्यानेच तुमच्या तिघांचाही धुर काढलाय, आता तिघांनाही समजलय ''अकेला देवेंद्र काय काय करतोय," असं म्हणत चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीला लक्ष केलं.
राज्यसभेच्या दोन जागा तर येणारच मात्र तिसरी जागाही सहज निवडुन येणार असा विश्वास चित्रा वाघ यांनी व्यक्त केला. "राज्यात सरकारी दवाखान्यात सामान्य नागरिक जाण्यासाठी घाबरतोय, तसंच राज्यात मोठे नेतेही सरकारी दवाखान्यांवर विश्वास ठेवत नाही तर गोरगरीबांनी तरी कसा विश्वास ठेवायचा? कोरोना काळात राज्यातील नेत्यांनी खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेतले. या नेत्यांची बिलही समोर आली आहे. त्यामुळे सरकारी दवाखान्याच्या या अवस्थेवर राज्यातील मंत्रीच विश्वास ठेवत नाहीत," असं म्हणत राज्य सरकारला चित्रा वाघ यांनी लक्ष केल आहे.
"पुढचा मुख्यमंत्री आमचाच म्हणणा-या राज्यातील तीन पक्षांच्या आघाडीची गोडी कडू झाली आहे. मात्र, सत्तेसाठी आणि भाजपाला दुर ठेवण्यासाठी हि गोडी घेत आहेत," अशी खरमरीत टीका चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर केली.
"राज्यात एवढं गंभीर प्रश्न असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांना आमचा पुढचा मुख्यमंत्री कोण याची स्वप्न पडतात, हि बाब दुदैवी आणि लाजीरवाणी गोष्ट आहे," अशी टीका करत मुख्यमंत्री होण्याची स्वप्न पहाणा-यांना चित्रा वाघ यांनी चिमटा काढला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.