Bjp ,congress Pune News
Bjp ,congress Pune News  Sarkarnama
पुणे

Kasba By Election : कसब्यात भाजप,काँग्रेसचं टेन्शन वाढलं; हिंदू महासंघाकडून 'हा' उमेदवार निवडणूक लढविणार!

सरकारनामा ब्यूरो

Anand Dave News : कसबा पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आता जवळपास संपुष्टात आली आहे. भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.

मात्र, उमेदवारीवरुन भाजप आणि काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य रंगलं आहे. तर टिळक कुटंबात उमेदवारी न दिल्यामुळे ब्राह्मण समाजाची नाराजी ओढावण्याची शक्यता नाकारता येत नाही. हाच मुद्दा उचलून धरत आता हिंदू महासंघानं भाजप विरोधात दंड थोपटत उमेदवार उतरवणार असल्याचं जाहीर केलं आहे.

भाजपने कसबा पोटनिवडणुकीतून टिळक घराण्याला डावललं आहे. त्याऐवजी हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली आहे. रासने हे भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे निकटवर्तीय आहेत. मात्र, टिळक कुटुंबाला तिकीट ने दिल्यामुळे मुक्ता टिळकांचे पती शैलेश टिळक यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. भाजपमधील हे नाराजी नाट्य सुरू असतानाच एका हिंदुत्ववादी नेत्यानेही कसबा विधानसभा पोटनिवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे.

हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) यांनी कसबा विधानसभा पोटनिवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे आता भाजप आणि काँग्रेसची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. आनंद दवे हे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत हिंदू महासंघाचे उमेदवार असणार आहे. दवे कसब्यातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. कसबा विधानसभा आम्ही पूर्ण ताकदीने लढवणार आहेत असं दवे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे कसब्यातून निवडणूक तिरंगी होणार असल्याचं चित्रं दिसत आहे.

याबाबत आनंद दवे म्हणाले, कसबा पोटनिवडणुकीतील भाजपने दिलेल्या उमेदवारीवरून ब्राम्हण समाजात तीव्र नाराजीआहे. तसेच भाजपकडून चिंचवडमध्ये न्याय तर कसब्यात अन्याय केला आहे.मात्र, हिंदु महासंघ ही निवडणुक लढवणार आहे. मंगळवारी (दि.७) दुपारी आम्ही अर्ज भरणार आहोत. खुल्या प्रवर्गाचा आवाज विधानसभेत पोहोचवण्याबरोबरच पुण्येश्वराला मुक्त करणं आणि स्वच्छ, सुरक्षित आणि सभ्य कसबा हेच आमचं कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील लढविण्यामागचं ध्येय असणार आहे असंही दवे यांनी जाहीर केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT