Ravindra Dhangekar : काँग्रेसकडून उमेदवारी निश्चित होताच धंगेकर टिळक कुटुंबियांच्या भेटीला..

Kasaba By Election : निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले होते. पण त्याला विरोधी पक्षांना प्रतिसाद दिला नाही.
Ravindra Dhangekar Kasaba By Election
Ravindra Dhangekar Kasaba By Electionsarkarnama
Published on
Updated on

Kasaba By Election :  कसबा पेठ मतदार संघात भाजपकडून हेमंत रासने (Hemant Rasane) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यानंतर आता काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. आज सकाळी काँग्रेस कार्यकर्ते जमणार असून अकरा वाजता धंगेकरांचा अर्ज भरण्यात येणार आहे

उमेदवारी निश्चित झाल्यावर धंगेकरांनी सर्वप्रथम केसरीवाड्यात टिळक कुटुंबियांची भेट घेतली. शैलेश टिळक, कुणाल टिळक, रोहित टिळक यांची त्यांनी भेट घेतली.

"कसबा मतदार संघात काम करताना दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्याशी २० वर्षांपासूनचा माझा संपर्क होतो. अनेक सामाजिक कामाबाबत त्यांच्याशी चर्चा होत असे. त्यामुळे आज टिळक कुटुंबियांची भेट आहे. काँग्रेसपक्षश्रेष्ठींनी मला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तयारी करण्यास सांगितले आहे,"

Ravindra Dhangekar Kasaba By Election
Kasaba By Election : 'सरकारनामा'चे वृत्त खरे ठरले : काँग्रेसकडून रविंद्र धंगेकरांच्या नावावर शिक्कामोर्तब..

शनिवारी भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली आहे. लवकरत धंगेकर यांचे नाव अधिकृतपणे जाहीर होणार आहे. आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ मतदार संघात पोटनिवडणूक होत आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले होते. पण त्याला विरोधी पक्षांना प्रतिसाद दिला नाही.

काँग्रेसकडून धंगेकर रिंगणात उतरल्याने कसब्याची ही निवडणूक अधिक रंगणार आहे. दोन्ही उमेदवारांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.रासने अकरा वाजता अर्ज भरणार आहेत.

Ravindra Dhangekar Kasaba By Election
Pune News : अविनाश बागवे भाजपच्या वाटेवर ? ; 'हे' आहे बागवे पिता-पुत्रांच्या नाराजीचे खरे कारण !

तर चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पोटनिवडणुक होत आहे.चिंचवडमधून भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून रविंद्र धंगेकर यांची ओळख होती. मनसेमध्ये असताना त्यांनी अनेक पदावर कामे केली आहेत. जानेवारी २०१७ मध्ये कॉंग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

शिवसेनेमध्ये दहा वर्षे आणि त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधून दहा वर्षे त्यांनी नगरसेवक म्हणून महापालिकेत काम पाहिले आहे. कसब्यामध्ये अनेक विकासकामे केली आहेत. खासदार गिरीश बापट यांचे कट्टर विरोधक म्हणून त्यांची पुणे शहरात ओळख आहे.

विधानसभा निवडणूकांमध्ये धंगेकर यांनी बापटांसमोर क़डवे आव्हान उभे केले होते.धंगेकर यांनी २००९ साली विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यांचा अवघ्या ७ हजार मतांनी पराभव झाला होता. त्यांनी बापटांना चांगली लढत दिली होती. २०१४च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीची राज्यात लाट असताना देखील धंगेकर यांनी आव्हान दिले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com