Devendra Fadnavis Sarkarnama
पुणे

Devendra Fadnavis News: फडणवीसांनी पुण्यात पाऊल ठेवताच भाजपच्या तीन नगरसेवकांनी त्यांना गाठलं; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

Pune Political News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी(ता.15 मार्च) पुणे दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पुणेकरांच्या सेवेसाठी उभारलेल्या मेट्रो भवनचं उद्घाटनही केलं. याचवेळी पुण्यातील भाजपच्या तीन नगरसेवकांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याचं दिसून आलं.

Sudesh Mitkar

Pune News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी(ता.15 मार्च) पुणे दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पुणेकरांच्या सेवेसाठी उभारलेल्या मेट्रो भवनचं उद्घाटनही केलं. उद्घाटनापूर्वी त्यांनी मेट्रो भवनची पाहणी केली आणि याचवेळी पुण्यातील भाजपच्या तीन नगरसेवकांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याचं दिसून आलं.

भाजप नगरसेवक अनिल टिंगरे, संगीता दांगट आणि आणि अश्विनी भंडारे यांनी रविवारी पुण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी संबंधित तीन नगरसेवकांनी फुलेनगर विश्रांतवाडी मार्गे आळंदीपर्यंत मेट्रो मार्ग न्यावा, अशी मागणी केली आहे. त्याबाबतचे पत्रही मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.

पुणे शहराचा पूर्व भाग म्हणून ओळखला जाणारा धानोरी, लोहगाव, कळस, विश्रांतवाडी, टिंगरेनगर, फुलेनगर, येरवडा तसेच पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर मागील काही वर्षात अत्यंत वेगाने विकसित होत असून या परिसरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. परिणामी, या भागातील नागरिकांना दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी व सार्वजनिक वाहतुकीच्या मर्यादित सुविधांचा सामना करावा लागत आहे,असं या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

त्यामुळे पुणे शहराच्या पूर्व भागातील वाढती लोकसंख्या व वाहतुकीची गरज लक्षात घेता फुलेनगर- विश्रांतवाडी - आळंदी असा मेट्रो मार्ग प्रस्तावित होणे अत्यंत आवश्यक आहे. या मार्गावरील धानोरी, लोहगाव, कळस, विश्रांतवाडी, टिंगरेनगर, फुलेनगर, येरवडा तसेच पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील नागरिक, विद्यार्थी, नोकरदार वर्ग, कामगार, महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने दररोज पुणे शहरात ये-जा करीत असतात.

या मेट्रो मार्गामुळे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाशी थेट व सुलभ सार्वजनिक वाहतूक जोडणी निर्माण होऊन देश-विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे समाधीस्थळ असलेल्या आळंदी येथे दररोज हजारो भाविक व वारकरी दर्शनासाठी येत असतात, प्रस्तावित मेट्रो मार्गामुळे वारकरी संप्रदाय तसेच भाविकांसाठी प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित व जलद होईल.

तसेच या मेट्रो मार्गामुळे पुणे शहर व पिंपरी-चिंचवड शहर यांच्यातील संपर्क अधिक सुलभ होऊन परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून पुणे शहरातून फुलेनगर- विश्रांतवाडी मार्गे आळंदीपर्यंत मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यासंदर्भात दखल घ्यावी अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT