Israel PM Netanyahu: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू ठार की जिवंत..? नव्या व्हिडीओतून मोठी अपडेट समोर

Iran Israel America War : एकीकडे इराण-इस्रायल-अमेरिका संघर्ष दिवसेंदिवस टोकदार होत चालला असतानाच पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू मागील काही दिवसांपासून मीडियासमोर झळकले नव्हते. तसेच त्यांनी त्यांच्यासंदर्भातला कोणतीही अपडेट समोर न आल्यामुळे तर्क वितर्कांना उधाण आले होते.
Benjamin Netanyahu Israel War
Benjamin Netanyahu Israel War Sarkarnama
Published on
Updated on

Iran Israel War News: सध्या जागतिक स्तरावर इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्ध भडकल्याचं दिसून येत आहे. या युद्धामुळे भारतासह संपूर्ण जगाला मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे. या युद्धात 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर केलेल्या संयुक्त हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. या घटनेनंतर इराणमध्ये 40 दिवसांचा दुखवटाही जाहीर करण्यात आला होता. याचदरम्यान आणखी एका चर्चांनी जगाची झोप उडवली होती.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हेही ठार झाल्याचं वृत्त येऊन धडकलं. नेतान्याहू यांची हत्या करण्यात आल्याचं बोललं जात होतं.यामुळे मोठी खळबळ उडाली होती. पण आता नेतान्याहू यांच्याबाबतचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या मृत्यूच्या अफवांनी जगभरात मोठी खळबळ उडालेली असतानाच रविवारी(ता.15) समोर आलेल्या नव्या व्हिडिओमध्ये नेतन्याहू जिवंत आणि कॉफी पिताना दिसत आहेत. यामुळे त्यांच्या मृत्यूच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. पण यादरम्यान,अद्यापही अनेक प्रश्न अनुत्तरीतच आहे.

एकीकडे इराण-इस्रायल-अमेरिका संघर्ष दिवसेंदिवस टोकदार होत चालला असतानाच पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू मागील काही दिवसांपासून मीडियासमोर झळकले नव्हते. तसेच त्यांनी त्यांच्यासंदर्भातला कोणतीही अपडेट समोर न आल्यामुळे तर्क वितर्कांना उधाण आले होते. अशातच एक व्हिडिओ आला आणि जगात खळबळ उडाली. या व्हिडीओनंतर धक्का बसला होता.

Benjamin Netanyahu Israel War
Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरलं! तारकेश्वर गडाच्या महंतांचे स्वत:वरच वार; रुग्णालयात उपचार सुरू,भाजप आमदार दाखल

आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओत नेतान्याहू एका रेस्टॉरंटमध्ये कॉफी पिताना दिसून येत आहे. आपल्या हाताला पाच बोटच असल्याचंही नेतान्याहू सांगत आहेत. या व्हिडीओमुळे आता नेतान्याहू हे जिवंत असून त्यांच्या मृत्यूच्या केवळ अफवाच असल्याचं स्पष्ट झालं आहे. या व्हिडीओला त्यावर मी काय आहे...? अशी प्रश्नार्थक कॅप्शनही देण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना ठार मारण्यात आल्याच्या अफवांनी जोर धरला होता. याचवेळी ते जर्मनीला पळून गेल्याचं बोललं जात होतं. यावर पंतप्रधान नेतान्याहू यांच्या कार्यालयातून ते पूर्णपणे सुरक्षित असल्याचं आणि कुठेही गेले नसल्याचं अधोरेखित करण्यात आलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com