Murlidhar Mohol Sarkarnama
पुणे

Murlidhar Mohol : दिल्लीत दिसला भाजपचा दम, मुरलीधर मोहोळांसाठी मात्र 'कही खुशी कही गम'

BJP Pune Union Minister Murlidhar Mohol Delhi Assembly elections : द्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर दिल्लीतील सोपवलेल्या दोन मतदारसंघापैकी एका मतदारसंघात भाजपचा पराभव झाला आहे.

Sudesh Mitkar

Pune News : दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने बंपरचीज मिळवली आहे. 70 जागांपैकी 48 जागा जिंकून भाजपने आपला दम दाखवला आहे.

या विजयामुळे 27 वर्षानंतर पुन्हा एकदा दिल्लीची सत्ता भाजपाला काबीज करता आली आहे. दुसरीकडे आम आदमी पार्टीला 22 जागा जिंकण्यात यश आले आहे.

एकीकडे भाजपने दिल्लीत दम दाखवला असताना दुसरीकडे पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री असलेल्या मुरलीधर मोहोळ यांच्यावर सोपवण्यात आलेल्या दोन मतदारसंघापैकी एका मतदारसंघात भाजपचा (BJP) पराभव झाला आहे. तर दुसऱ्या विधानसभा मतदारसंघात अवघ्या 300 मतांनी निसटता विजय मिळाला आहे. त्यामुळे दिल्लीच्या विजयाच्या आनंदात देखील मोहोळ यांच्यासाठी 'काही खुशी कही गम' राहिले आहे.

गेली 27 वर्ष भाजपापासून दिल्ली दूरच राहिली त्यामुळे यंदा कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचाच, असा चंग बांधलेले भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीमध्ये (Delhi) पूर्ण ताकद झोकुन दिली होती. प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी मायक्रो प्लॅनिंग करण्यात आले होते. तसंच देशभरातील नेत्यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या कामाला लावण्यात आलं होतं. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही नेत्यांवर दिल्लीतील तीन लाख निर्णयक मराठी मतदारांना भाजपच्या बाजूने वळवण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

तसंच केंद्रीय मंत्री असलेल्या मुरलीधर मोहोळ यांच्यावर दिल्लीतील संगम विहार आणि बदरपूर या विधानसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली होती. या मतदारसंघातील भाजपची प्रचाराची तशीच निवडणुकीची रणनीती ठरवून या उमेदवारांना विजयी करण्याची जबाबदारी मुरलीधर मोहोळ यांच्याकडे होती.

यातील संगम विहार या मतदारसंघांमध्ये भाजपला 344 मतांनी निसटता विजय मिळवला आहे. सलग दोन टर्म आपकडून मोठा विजय मिळवणारे दिनेश मोहनिया यांचा पराभव भाजपचे चंदन कुमार चौधरी यांनी केला आहे. बदरपूर विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास हा मतदारसंघ भाजपचा गड मानला जातो. मागील निवडणुकीत 'आप'ची लाट असताना देखील या विधानसभा मतदारसंघात भाजपने बाजी मारली होती.

मात्र यंदा भाजपची लाट असताना देखील या विधानसभा मतदारसंघात भाजपचा मोठा पराभव झाला आहे. भाजपच्या नारायण दत्त शर्मा यांचा आप उमेदवार राम सिंह नेताजी यांनी तब्बल 27 हजार मतांनी पराभव केला आहे. त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांच्या ज्या डावपेजांमुळे शहरातील सहा विधानसभा मतदारसंघावर भाजपला यश मिळवता आलं ते डावपेच दिल्लीच्या मैदानात चालले नाहीत अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT