Bacchu Kadu : बच्चू कडू यांचं अमरावती जिल्हा सहकारी बँकेचं अध्यक्षपद धोक्यात, विरोधकांनी केलं टार्गेट

Amravati Zilla Cooperative Bank President Bacchu Kadu Notice Divisional Joint Registrar : प्रहार पक्षाचे संस्थापक तथा माजी आमदार बच्चू कडू यांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली आहे.
Bacchu Kadu
Bacchu KaduSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शेतकरी चळवळीतले नेते बच्चू कडू यांच्या राजकारणाला विरोधकांकडून घेरलं जात आहे. अमरावती सहकारी बँकेचे त्यांचे अध्यक्षपद धोक्यात आले आहे. विभागीय सहनिंबधकांनी बच्चू कडू यांना जिल्हा बँकेतील संचालक पदाच्या अपात्रतेची नोटीस बजावली आहे.

सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. यावर बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतो आहे, म्हणून नोटीस बजावण्यात आल्याचा आरोप केला आहे.

बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणुकीत राज्यात तिसरी आघाडी उभी केली होती. यात तिसऱ्या आघाडीचा पुरता धुव्वा उडाला. बच्चू कडू यांचा पराभव झाला. आमदारकी गेल्यानंतर आता त्यांच्याकडे अमरावती (Amravati) जिल्हा सहकारी बँकेचे असलेले अध्यक्षपद देखील धोक्यात आलं आहे. विभागीय सहनिंबधकांनी त्यांना अपात्रतेची नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे.

Bacchu Kadu
Sujay Vikhe : थोरातांच्या घराशेजारील मैदानावर सुजय विखेंचा 'मैं हूँ डॉन' गाण्यावर डान्स...

बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड आणि 11 संचालकांनी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu ) यांना बँकेच्या संचालक पदावरून अपात्र करण्याबाबतची याचिका दाखल केली आहे. नाशिक न्यायालयाने बच्चू कडू यांना एका प्रकरणात एका वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. याचा आधार घेत विभागीय सहनिबंधक यांनी आपणास अपात्र का करण्यात येऊ नये, तसेच पुढील पाच वर्षाकरीता आपणास सदरचे पद धारण करण्यास अपात्र का करू नये? अशी नोटीस बच्चू कडू यांना बजावली आहे.

Bacchu Kadu
Top 10 News : महाजनांचे खडसेंना सणसणीत उत्तर, ‘खडसेंचा हावरटपणा!' - वाचा ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

सहनिंबधकांनी नोटीसमध्ये बच्चू कडू यांना दाखल याचिकेवर 24 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजता साक्ष नोंदविण्याकरिता समक्ष अथवा प्राधिकृत प्रतिनिधीमार्फत उपस्थित राहण्याचा आदेश दिला आहे. यामुळे बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढण्याची शक्यता आहे.

बच्चू कडूंना कोणत्या प्रकरणात शिक्षा

नाशिकच्या सरकारवाडी पोलिस ठाण्यात बच्चू कडू यांच्यावर 2017 मध्ये सरकारी कामात अडथळा आणल्याचा आणि आणि मारहाण केल्याच्या गुन्ह्यात विशेष न्यायालयाने एक वर्षांपर्यंत कठोर कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या शिक्षेला बच्चू कडूंनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. याच प्रकरणाचा दाखला देत अमरावती जिल्हा सहकारी बँकेतील विरोधी गटातील संचालकांनी बच्चू कडू यांच्याविरोधात याचिका दाखल करत हटवण्याची मागणी केली आहे.

नोटीसविरुद्ध न्यायालयीन लढणार

दरम्यान, बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत असताना अशा प्रकारचा नोटीस येत असतात, अशी प्रतिक्रिया दिली. बँकेवर संचालक असताना माझ्या विरोधात काँग्रेस आणि भाजपवाले एकवटले आहेत. मी देखील या नोटीस बाबतीत न्यायालयीन लढाई लढणार आहे, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.

अन्नत्याग आंदोलनाचा इशारा

राज्यात लाडक्या बहिणीसाठी पैसे आहेत. परंतु दिव्यांग बांधव आणि विधवा महिला यांना मागील सहा महिन्यापासून वेतन मिळालेले नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 5 तारखेपूर्वी पैसे देणार होते. पण आले नाहीत, याचाच निषेध करण्यासाठी 21 तारखेपासून रायगडाच्या पायथ्याशी अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com