BJP Pune Sarkarnama
पुणे

Pune BJP: भाजपच्या गोटातून मोठी बातमी: मुळशीच्या वर्षासहलीत कसबा अन् कोथरुडच्या नेत्यांमध्ये बाचाबाची?

BJP Political News : पुणे शहर भाजपच्या अध्यक्षपदी धीरज घाटे यांची फेरनिवड झाली, तसेच आठ विधानसभा मतदारसंघात मंडल अध्यक्षांची निवड झाली आहे. येत्या काळात शहर भाजपची नवीन कार्यकारिणीही जाहीर होणार आहे.

ब्रिजमोहन पाटील : सरकारनामा ब्यूरो

Pune News : भाजपच्या माजी नगरसेवकांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये सुसंवाद व्हावा, मौजमजा करता यावी यासाठी मुळशी येथे वर्षासहल काढण्यात आली होती. सर्वजण मस्ती करत असताना कसब्यातील एका नगरसेवकांत आणि कोथरूडमधील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली, त्यांच्या हाणामारी होणार होती पण तेवढ्यात अन्य पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्याने पुढील घटना टळली.

पुणे शहर भाजपच्या (BJP) अध्यक्षपदी धीरज घाटे यांची फेरनिवड झाली, तसेच आठ विधानसभा मतदारसंघात मंडल अध्यक्षांची निवड झाली आहे. येत्या काळात शहर भाजपची नवीन कार्यकारिणीही जाहीर होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मुळशीतील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी बुधवारी (ता. ४) वर्षासहल आयोजित केली होती.

सकाळी साडेआठच्या सुमारास शहर कार्यालयात सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक एकत्र आले. यात महिलांचाही समावेश होता. त्यानंतर सुमारे अडीचशे जणांचा ताफा मुळशीकडे निघाला. एका फार्महाऊसमध्ये जेवण केले. त्यानंतर एका रिसॉर्टवर साहसी खेळ खेळण्यासाठी पदाधिकारी गेले. तेथे विविध प्रकारचे खेळ खेळले जात होते, ट्रॅक्टरमध्ये बसून रिसॉर्टमध्ये फेरफटकाही मारला.

पाऊस पडत असताना पदाधिकाऱ्यांमध्ये मौजमजा, हास्यविनोद सुरु होती. पण त्यावेळी कसब्यातील माजी नगरसेवक आणि कोथरूडमधील (Kothrud) पदाधिकारी या दोघांमध्ये थट्टा मस्करी सुरु होती. पण त्याचवेळी एकाला राग आल्याने त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली.

हा वाद वाढतच गेल्याने अन्य पदाधिकारी दोघांना शांत होण्यास सांगत होते. पण वाद संपण्याऐवजी ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. इतरांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना दूर करून शांत केले. अनपेक्षितपणे घडलेल्या या प्रकारामुळे ऐन रंगात आलेली वर्षा सहलीचा बेरंग झाला.

काही काळ वातावरण शांत होते. पण त्यानंतर संध्याकाळी गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम संपल्यानंतर परतीचा प्रवास सुरु झाला, अशी माहिती उपस्थिती काही पदाधिकाऱ्यांनी दिली. याबाबत शहराध्यक्ष धीरज घाटे यांना विचारले असता वर्षा सहलीमध्ये असा कोणताही प्रकार घडलेला नाही. अनेक दिवसांनी सर्वजण एकत्र आले होते. सर्वांनी भरपूर धमाल केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT